कोल्हापूर पोटनिवडणूक! पैसे वाटप केल्याप्रकरणी भाजपच्या 5 कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, हजारोंची रोकड जप्त

भाजप आणि महाविकास आघाडीनं प्रतिष्ठेची केलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होतं आहे. भाजपच्या सत्यजित कदम आणि काँग्रेसच्या जयश्री पाटलांमद्धे तगडी लढत पाहायला मिळत आहे. तसेच या प्रक्रियेसाठी एकूण 2 हजार 142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकूण 357 केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री पाटील तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात आहे. तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तर दुसरीकडे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पाकिटातून पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भाजपच्या ५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८६ हजार ३० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

तसेच कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिरातील मतदान केंद्रावर सतेज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर जहरी टीका केली. ‘भाजपला जनाधार नाही, यामुळे त्यांनी पैसे वाटले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

‘पैशानं स्वाभिमान विकला जाणार नाही हे कोल्हापूरचे लोक दाखवून देतील,’ असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने कुठेही पैशांचे वाटप केलेले नाही, असा दावा सतेज पाटील यांनी केला. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे.

दरम्यान, रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांनी कोल्हापुरात सभा घेतल्या. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेला संबोधीत केलं. यावेळी त्यांनी कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडून येणार हे नक्की असा विश्वास व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या
रखरखत्या उन्हात सायकलवरून फूड डिलिव्हरी करतोय शिक्षक, संघर्षगाथा वाचून पाणावतील डोळे
“सोमय्यांनी कोर्टात स्वताच चोरी मान्य केली, त्यामुळे आता त्यांना कधीही अटक होऊ शकते”
कोट्यवधींची मालकीन असणाऱ्या समंथाकडे एकेकाळी शिक्षणासाठी नव्हते पैसे; ‘हे’ काम करून झाली टॉलिवूडची स्टार
मी असे पुरस्कार घेत नाही पण, ‘हा’ माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार; मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं