Share

आदित्य ठाकरेंची मनसेवर सणसणीत टीका; ‘संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही’

raj

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात केलेले भाषण चांगलेच गाजले. राज ठाकरे यांनी अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. आज मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेनं थेट शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केलं.

शिवसेनेला हिंदुत्वासाठी जागं करण्याचा प्रयत्न असल्याचं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर लाउडस्पीकर जप्त केले आहेत. आज रामनवमी उत्सव आहे. त्याचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं.

याचाच धागा पकडत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपले काका असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षावर घणाघाती टीका केली. “स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही”, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मनसेला सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

मनसेच्या सदर प्रकरणार बोलताना आदित्य ठाकरे म्हणतात, ‘संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. तसेच स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आज आदित्य यांनी लो‌अर परळ ब्रीजवर कामाची पाहणी केली.

यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ‘विरोधक आणि आमच्यात हाच फरक आहे आम्ही काम करतोय ते दिसतंय. ‘रघुकुल रीत सदा चली आये प्राण जाये पर वचन ना जाये’ जनतेला दिलेली वचने आम्ही पूर्ण करत आहोत. मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकाराने शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा भोंगाद्वारे लावण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच भोंगे देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आले. मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ‘आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी का अटक केली हे माहीत नाही. शिवसेना भवन हे काही मुस्लिमांचं स्थळ नाही. हिंदुत्ववाद्यांचं कार्यालय आहे. त्यामुळे तिथे हनुमान चालिसा म्हटलं तर बिघडलं कुठं? असा संतप्त सवाल मनसेने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
हा गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान हेच समजत नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला
4 दिवसांपूर्वीच शिजला कट; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती आली समोर
“पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या कामगारांना पुन्हा नोकरीवर घेणार नाही”; सरकारची घोषणा
गालावर किस करायचा होता टास्क अन् तिने थेट केला लिपलॉक; ‘लॉकअप’मधला किसिंगचा VIDEO झाला व्हायरल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now