शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली.
आता यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली असून ठिकठिकाणी या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ठाणे येथे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गांधी पुतळ्यासमोर मूक निदर्शने केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राणा कुटुंबीयांवर जहरी टीका केली. …म्हणजे तुम्ही पवारांचं मुंडकं उडवण्याची भाषा करताय? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच ‘गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है,’ असे म्हणत आव्हाड यांनी शुक्रवारी घडलेल्या संपूर्ण प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला.
काल अमरावतीत राणा कुटुंबीयांनी कालच्या आंदोलनाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली. याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, ‘अमरावतीमधून एक नेता म्हणतो, शरद पवारांचे आता वाईट दिवस सुरू झाले, महाराष्ट्रात आता फ्रेंच राज्यक्रांतीसारखं काही तरी घडणार आहे. म्हणजे तुम्ही पवारांचं मुंडकं उडवण्याची भाषा करताय? असा संतप्त सवाल आव्हाड यांनी व्यक्त केला.
पुढे आव्हाड म्हणतात, ‘तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र हे सहन करेल? महाराष्ट्र लोकशाही मानणारा देश आहे. तुम्ही स्वत: च्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेताय. पवारांवर प्रेम करणाऱ्या चार पिढ्या आहेत. आणि त्याच्यात एसटी कामगार आहेत. पन्नास वर्ष एसटी कामगार त्यांच्या सोबत होते, असे आव्हाड म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी पवारांच्या घरासमोर घडलेला प्रकार हे पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे, तर राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांकडूनच असे हल्ले करण्यात येत असल्याचं महाविकास आघाडीतील नेत्यानी म्हंटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अनिल देशमुखांची संपत्ती परत करा; रुपाली पाटील यांची पोस्ट तुफान व्हायरल, वाचा पोस्ट
अखेर इम्रान खानची पंतप्रधान पदावरून झाली गच्छंती, आता तुरुंगात सडावं लागणार? कोण असेल पाकिस्तानचा नवीन पीएम
Video: लॉकअपमध्ये वाहू लागले प्रेमाचे वारे, टिकटॉक स्टार अंजली ‘या’ स्पर्धकाच्या पडली प्रेमात, दिली प्रेमाची कबुली
शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला पूर्वनियोजित कट; पोलिसांना अलर्ट दिला होता, मात्र…, समोर आली नवीन माहिती