तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार यंदा पाहिला मिळाला. कोरोनामुळे गेले दोन वर्ष जणू काही सारं विश्वच थांबलं होतं. मात्र आता निर्बंधमुक्तीकडे आपण वळलो आहे. अशातच साताऱ्यामध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला सुरुवात झाली. दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्यानं यावर्षी सर्व पैलवान मोठ्या तयारीनिशी फडात उतरले.
अशातच मानाची गदा कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कुस्ती क्रीडा प्रकारातील मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या मल्लानं बाजी मारली आहे. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा मल्ल विशाल बनकर यांच्यात तगडी लढत झाली.
पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचं तर दुसरा विशाल बनकर मुंबईचं प्रतिनिधित्व करत होता. अखेर अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराजने विशालला 5-4 ने मात दिली. विशेष बाब म्हणजे जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे.
खेळात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. अगदी अशाच अटीतटीच्या लढतीत पिछाडीवर असताना पृथ्वीराजनं शेवटच्या 45 सेकंदात सामन्याला मोठी कलाटणी दिली. त्याने 5-4 अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावे केला. पहिल्या फेरीत बनकरनं 4-0 अशी आघाडी घेतली होती.
दरम्यान, यंदा साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला. राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून आला.
थोडक्यात पृथ्वीराज पाटील’ची ओळख.. पृथ्वीराज हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत. पृथ्वीराजने कुस्तीचा श्रीगणेशा मोतीबाग तालमीतून केला आहे. त्याचे वजन ९५ किलो आहे.
महत्त्वाच्या बातम्या
“गेल्या काही दिवसातील घटना चित्रपटातील भयानक दृश्यासारख्या…” अपघातातून सावरल्यानंतर मलायका अरोराची भावनिक पोस्ट
जेवणासाठी पैसै नव्हते म्हणून महिलेनं केला अजब प्रताप, 16 पुरूषांसोबत गेली डेटवर आणि.., वाचून अवाक व्हाल
अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारत दिले ‘हे’ आदेश
औरंगबादेच्या महाराजांचा सेक्स व्हिडीओ झाला व्हायरल, वारकरी सांप्रदायाने केली कारवाईची मागणी






