काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम’ (Kacha Badam) हे गाणं फारच व्हायरल झालं होतं. पश्चिम बंगाल येथे शेंगदाणे विकणारे भुबन बड्याकर यांनी हे गाणं गायलं होतं. या गाण्यामुळे ते फारच लोकप्रिय झाले होते. पण प्रसिद्धी मिळताच भुबन बड्याकर यांचा मात्र फारच तोरा चढला होता. ते स्वतःला सेलिब्रिटी समजू लागले. आता मी सेलिब्रिटी झालो असून पुन्हा शेंगदाणे विकणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना अनेकांनी ट्रोल केले होते. पण आता भुबन बड्याकर यांचं डोकं ठिकाणावर आलं आहे.
भुबन बड्याकर यांनी नुकतीच एका मुलाखतीत बोलताना म्हटले की, ‘मी काही सेलिब्रिटी नाही. गरज पडली तर मी पुन्हा शेंगदाणे विकणार. मला आता जाणीव झाली आहे की, मला कारची गरज नव्हती. अचानक पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्याने माझं डोकंच फिरलं होतं. पण मला आता कळालं की, जीवन कसे जगायचे.
भुबन बड्याकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘कच्चा बदाम’ गाण्याला यश मिळाल्यानंतर त्याला केरळ, बांग्लादेश तसेच दुबईतसुद्धा गाणं गाण्याची ऑफर मिळाली. पण त्यांच्याकडे पासपोर्ट नव्हता त्यामुळे ते जाऊ शकले नाही. तसेच भुबन यांनी विदेशात जाण्यासाठी त्यांची पत्नीसुद्धा इच्छित नव्हती.
यापूर्वी भुबन बड्याकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, ‘मी स्वतःला नशीबवान समजतो की, मला तुम्हा सर्वांकडून इतका प्रेम मिळाला आहे. मी एक सामान्य माणूस आहे आणि आतापर्यंत जगत होतो तसेच जीवन यापुढेही जगणार. मी तुम्हाला आश्वासन देतो की, एक व्यक्ती म्हणून माझ्यात कोणताही बदल झालेला नाही’.
दरम्यान, भुबन बड्याकर हे पश्चिम बंगालच्या बीरभूमी जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांचा पत्नी, दोन मुले आणि एक मुलगा असा परिवार आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी ते घरातील तुटलेल्या वस्तूंच्या बदल्यात शेंगदाणे विकण्याचे काम करत असत. त्यासाठी ते सायकलवर वेगवेगळ्या गावात फिरत शेंगदाणे विकत असत. दररोज ३ ते ४ किलो शेंगदाणे विकून ते २०० ते २५० रूपयांची कमाई करत असत.
शेंगदाणे विकता विकता भुबन कच्चा बदाम हे गाणं गात असत. त्यानंतर त्यांचं हे गाणं गातानाचं व्हिडिओ एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या व्हिडिओला रिमिक्स करून युट्यूबवर अपलोड करण्यात आले. तर बघता बघता हा व्हिडिओ त्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
या व्हिडिओमुळे गावोगावी फिरून शेंगदाणे विकणारे भुबन एका रात्रीत स्टार झाले. ‘कच्चा बादाम’ या गाण्यामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी शेंगदाणे विकण्याचे काम बंद केले. ‘कच्चा बदाम’ गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना इतर अनेक शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी एक सेकंड हँड कारसुद्धा खरेदी केली होती. ही कार चाव कार चालवायला शिकत असताना त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात भुबन बड्याकर यांना दुखापत झाली होती. पण नंतर ते ठीक झाले.
महत्त्वाच्या बातम्या :
‘बाळूमामा’च्या सेटवर राडा, सेट निर्मात्याचा मोडला पाय, लाथा बुक्क्यांनी केली मारहाण; वाचा नेमकं काय घडलं?
तुझ्या मुर्ख बायकोला समजाव नाहीतर.., ट्विंकलच्या ‘या’ कृतीमुळे अक्षयकुमारवर भडकले लोकं
आयुष्यात दोनच गोष्टी गरम हव्या, एक जेवण आणि दुसरी.., कंगनाच्या शोमध्ये अभिनेत्याची घसरली जीभ