Share

रोहितला वडापाव म्हणाल्याने सेहवागवर भडकले मुंबईचे चाहते, नंतर सेहवाग म्हणाला, वडापाव म्हणजे..

टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून मुंबई इंडियन्सच्या दारुण पराभवानंतर त्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. त्याने एक ट्विट केलं आहे जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे सोशल मीडियावर रोहित शर्माचे अनेक चाहते त्याला ट्रोल करत आहेत.

आता सेहवागने नेमकं असं काय ट्विट केले ज्यामुळे त्याला एवढं ट्रोल केलं जात आहे असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो नेमकं प्रकरण काय आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून मुंबई इंडियन्सच्या दारुण पराभव झाला.

सामन्यात पॅट कमिन्सने 15 चेंडूत नाबाद 56 धावांची तुफानी खेळी करत मुंबई इंडियन्सला एकहाती खिंडार पाडले. मुंबई इंडियन्सविरुद्ध धडाकेबाज खेळी खेळताना पॅट कमिन्सने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सामन्यात एका क्षणी पराभवाच्या उंबरठ्यावर होता. मात्र पॅट कमिन्सने संपूर्ण सामना सामना पालटवला. पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्सच्या तोंडून विजय हिसकावून घेतला अशा परिस्थितीत वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केले.

सेहवागने ट्विटरवर लिहिलं की, “तोंडातून घास हिसकावून घेतला, माफ करा वडापाव हिसकावून घेतला.” असं खोचक ट्वीट केलं. या ट्विटमुळे रोहित शर्माचे चाहते तसेच मुंबई इंडियन्सचे फँन्स वीरेंद्र सेहवागवर प्रचंड चिडले. त्याच्या ट्विट वरती अनेकांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली.

सेहवागवर अनेकांनी टीका केल्यामुळे त्याने पुन्हा एक ट्विट केले ज्यामध्ये त्याने स्पष्टीकरण दिले. म्हणाला, “वडा पाव म्हणजे मुंबई, वडा पावसाठी ओळखले जाणारे शहर. रोहितच्या चाहत्यांनो शांत व्हा, मी तुमच्यापैकी बहुतेक लोकांपेक्षा त्याच्या फलंदाजीचा मोठा चाहता आहे.”त्यानंतर सेहवागच्या ट्विटमुळे जो वाद निर्माण झाला होता, त्याला सेहवागच्याच स्पष्टीकरणामुळे पूर्ण विराम मिळाला.

दुसरीकडे एका युजरने वडा पावचा उल्लेख करत मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माला डिवचण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्मा फक्त 3 रनवर माघारी परतला. त्यामुळे मुंबईने 16 कोटी रुपये वाया घालवले अशी टीका चाहत्यांकडून करण्यात आली. मुंबईने रोहित शर्मासाठी 16 कोटी रुपये मोजले आहेत.

मनोरंजन खेळ

Join WhatsApp

Join Now