प्राण्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. मात्र अनेकदा त्यांच्या भावना कृतीतून नकळत पणे व्यक्त होतं असतात. मालक आणि त्याचा प्राणी यांच नातंच जगावेगळं असतं. अशी तुम्ही अनेक उदाहरणे पाहिली असतील. बैलचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मालक ढसाढसा रडल्याची बातमी तुम्ही वाचली असेलच.
तसेच अलीकडे सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतं असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात तर काही समाज प्रबोधन करणारे असतात मात्र काही व्हिडिओ आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतं आहे.
हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल. एक घोडा वेगाने जवळपास 8 किलोमीटर रुग्णवाहिकेच्या मागे धावला आहे. विशेष बाब म्हणजे या व्हिडिओला जवळपास 68 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर जाणून घेऊया हा घोडा रुग्णवाहिकेच्या मागे का धावत होता?
This horse ran behind the ambulance taking his sick sister to the veterinary hospital in Udaipur, India. Hospital kept both of them together until the mare recovered. And we think animals have lesser feelings than us …
(Via Channa Prakash) pic.twitter.com/sgV11DAglE— Susanta Nanda (@susantananda3) April 2, 2022
हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळाली नाहीये. मात्र IFS सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसतं आहे की हा घोडा सुसाट रुग्णवाहिकेच्या मागे धावत आहे. घोड्याने रुग्णवाहिकेचा पिछा सोडलेला नाहीये.
जाणून घ्या सविस्तर ‘कारण’.. मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णवाहिकेत त्याची एक आजारी बहीण होती, जिला उपचारासाठी घेऊन जाण्यात येत होतं. घोडी आजारी असल्याने तिला रुग्णवाहिकेत ठेऊन हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आजारी घोडीला घेऊन रुग्णवाहिका हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघाली.
हे पाहून घोडा रुग्णवाहिकेच्या मागे धावायला लागला. रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये थांबेपर्यंत तो मागे धावतच राहिला. मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे सोबत असायचे. बोलून व्यक्त होता येत नसलं तरी बहिणीसाठी घोड्याने धावत 8 किलोमीटरचा प्रवास केला. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
प्रेयसीला गुपचूप भेटायला आलेल्या तरुणाला घरच्यांनी पकडले अन्…असे काही केले की, वाचून बसेल धक्का
अंगठे बहादूर महिलेनी केली कमाल! स्ट्रॉबेरी शेतीतून कमवित आहे लाखो रुपये; महिलांसाठी बनली एक प्रेरणास्रोत
बॉलिवूडवर शोककळा! सदाबहार गाणी लिहीणाऱ्या गीतकाराचे मेंदूतील रक्त गोठल्यामुळे निधन
पद गेलं तरी चालेल पण.., मनसेने हकालपट्टी केली तरी वसंत मोरे आपल्या भूमिकेवर ठाम