Share

तुमचा बाप जरी खाली आला ना तरी मी गुढघे टेकणार नाही, ED च्या कारवाईनंतर राऊतांनी फोडली डरकाळी

sanjay raut

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने (ed) जप्त केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये जमिनीचे ८ प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट या संपत्तीचा समावेश आहे.

या कारवाई नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. 2009मधील ही प्रॉपर्टी असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत चांगलेच आक्रमक झाले. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ‘तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, असे म्हणत राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असले. तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून टाकू, असं संजय राऊत यांनी म्हंटले.

दरम्यान, ‘गेल्या वेळी जे ५५ लाखांचे कर्ज जमा केले त्या कर्जाची माहिती शपथपत्रात नमुद केली आहे. पण त्यांनी माझ्यावर आणि राज्यातील इतर मंत्र्यांवर कारवाई करुन त्यांनी स्वत:ची कबर खोदायला सुरुवात केली असल्याचा गर्भित इशारा राऊत यांनी दिला आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय? एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यात दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भुखंड जप्त करण्यात आले आहे. या कारवाई नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO: पूनम पांडेने दिलेले वचन पाळण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या, कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस
दिवसा ढवळ्या नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डरची गोळ्या झाडून हत्या, व्हायरल व्हिडीओनंतर दहशतीचे वातावरण
भारतीय संघ नेहमी निळ्या रंगाचीच जर्सी का घालतो? वाचा भारतीय संघाचा इतिहास
भारतीय संघ नेहमी निळ्या रंगाचीच जर्सी का घालतो? वाचा भारतीय संघाचा इतिहास

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now