मशिदींवरील भोंग्यावरून वंचित – मनसेत जुंपली! राज ठाकरेंना अटक होणार? वंचितने थेट प्रसिद्धीपत्रक काढून केले गंभीर आरोप

शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित मनसे मेळाव्यामध्ये भाषण केले. यावेळी राज ठाकरे यांनी आझानसाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर आक्षेप घेतला. मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका मांडताना मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे. राज यांनी आपल्या भाषणात मुंबईतील काही भागांचा उल्लेख केला. त्यात, मुब्रा परिसरातील मशिदींवर ईडीने धाडी टाकाव्यात, असेही म्हटले

यावरून आता चांगलेच राजकारण तापले आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. तसेच राज ठाकरेंच्या विधानात तथ्य आढळून आले नाही तर त्यांना युएपीए कायद्यांतर्गत पोलिसांनी बेड्या ठोकाव्यात, मागणी वंचितने केली आहे.

याबाबत वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या नावाने प्रसिद्धीपत्रक काढून राज यांच्या भाषणावर स्पष्ट शब्दात भूमिका मांडली आहे. याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने राज ठाकरेंचे भाषण गंभीरतेनं घेण्याचं सूचवलं आहे. तर जाणून घ्या वंचितने प्रसिद्धीपत्रकात नेमकं काय म्हंटले आहे.

दरम्यान, रेखा ठाकूर यांनी म्हंटले आहे की, राज ठाकरे यांचे स्त्रोत तपासून पोलिसांनी ज्या मशिदीत अथवा मदरशांमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत, तेथे कसून चौकशी करावी. जर काही तथ्य आढळल्यास मशिदी सील करुन जबाबदार मशिद/मदरसा समितीवर कडक कायदेशीर कारवाई करावी”, असे वंचितन म्हटले आहे.

मात्र जर राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य आढळून आले नाही तर समाजामध्ये दहशत व विद्वेष पसरविण्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करून राज ठाकरेंना बेड्या ठोकाव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
जिद्दीला सलाम! ११ वर्षांची चिमुकली भावाला मांडीवर घेऊन बसते शाळेत, फोटो पाहून तुमचेही डोळे पाणावतील
सनी लिओनीने मुंबईत घेतलं आपल्या स्वप्नातलं घर, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का
रामचरणने RRR च्या संपुर्ण टीमला दिली चक्क सोन्याची नाणी भेट, कारण वाचून कराल त्याचे कौतुक
HDFC च्या विलीनीकरणामुळे शेअर बाजारात खळबळ, HDFC च्या शेअर्समध्ये आली तुफान तेजी