Share

शरद पवारांनी कितीवेळा रंग बदललेत?; भाजपने इतिहासाचे थेट दाखले केले सादर

sharad pawar

शिवाजी पार्क इथे पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका करताना, राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला. 1999 ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं, अस राज ठाकरे यांनी म्हंटले.

पुढे राज ठाकरे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा जन्म होण्याआधी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून टीका केली जात असून ‘रंग बदलणारा सरडा’ असं म्हटलं जात आहे. याचाच धागा पकडत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंचा उल्लेख न करता यावरुन राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलं आहे.

याबाबत केशव उपाध्ये यांनी ट्विट करत राष्ट्रवादी पुढे अनेक सवाल उपस्थित केले आहे. उपाध्ये यांनी शरद पवारांच्या इतिहासातील वेगवेगळ्या निर्णयांचे दाखलेही दिले आहेत. ‘…रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे, पण शरद पवार यांचं काय?, ‘ असा संतप्त सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

वाचा काय आहे केशव उपाध्ये यांचं ट्विट.. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचाही उल्लेख केला. याचबरोबर “२०१४ मध्ये भाजपा सरकार स्थापन करणार हे जाणताच थेट न मागता पाठिंबा द्यायला पवारच पुढे आले,” याची आठवण केशव उपाध्ये यांनी करुन दिली.

https://twitter.com/keshavupadhye/status/1510909999895445505?s=20&t=SPHh5WD8VjsN2D-KUZFZuQ

दरम्यान, ‘शरद पवार १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. पुन्हा १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. त्यानंतर १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्याचा त्यांनी उल्लेख ट्विटमध्ये केला.

महत्त्वाच्या बातम्या
मुंबई पालिकेत इतिहासाची पुनरावृत्ती होणार; रामदास आठवलेंनी केले मोठे विधान, म्हणाले…
माझ्या नवऱ्याची एक भानगड काढा, मी राजकारण सोडेन; चित्रा वाघांचं ओपन चॅलेंज
भारतात आढळली आठ तळ्यांची गुफा, १५० मीटरपेक्षाही जास्त खोल; आत आढळल्या ‘या’ गोष्टी
सुपरहिट! RRR ने रजनीकांतच्या ‘या’ चित्रपटाचाही मोडला रेकॉर्ड, राजामौली झाले मालामाल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now