पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून हटविण्यासाठी विरोधकांच्या हालचालींनी वेग घेतला आहे. अशा स्थितीतच पाकिस्तानच्या कॅबिनेट सचिवालयाने इम्रान खान यांना पदावरुन हटविण्यासाठी अधिसूचना जारी केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. सचिवालयाने घेतलेल्या या निर्णयाचा धक्का खान यांना चांगलाच बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या संसदेत मोठ्या घडामोडी पाहिला मिळत आहेत. विरोधक इम्रान खान यांना सत्तेतून उतरवण्यासाठी चारी बाजूंनी प्रयत्न करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी नॅशनल असेंब्ली बरखास्त केल्याचे अधिसूचनेत सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने फेटाळून लावला आहे. यामुळे खान यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. परंतु हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे डेप्युटी स्पीकरवर विरोधकांनी गंभीर टीका केली आहे. स्पीकरने घेतलेला निर्णय असंविधानिक असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर, रविवारी नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याच्या विरोधात विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी न्यायालयाने “नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे सर्व आदेश आणि कृती न्यायालयाच्या आदेशांच्या अधीन असतील” असे सुनावणीदरम्यान सांगितले.
या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी केली. त्यांनी सुनावणीवेळी संसदेच्या नियमांची विरोधकांना आठवण करुन दिली. दरम्यान पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी खान यांच्या आदेशानुसार संसद विसर्जित केली आहे. परंतु या निर्णयावर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.
संसदेतील हे तापते वातावरण बघत सर्वोच्च न्यायालयाने देशातील राजकिय परिस्थितीत स्वतःहून दखल घेण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या अध्यक्षांनी संसदिय अध्यक्ष आणि उपसभापती यांना नोटीसा बजावल्या आहेत. आता संसद बरखास्त केल्यामुळे 90 दिवसांच्या आत नव्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर “माझ्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव हा प्रत्यक्षात परकीय डाव होता. आता निवडणुकीसाठी सज्ज राहा. पाकिस्तानचे भवितव्य कोणतीही भ्रष्ट शक्ती ठरवू शकत नाही.” असा इशार इम्रान खान यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
ताजमहाल नाही तर श्रीरामाने बांधलेला सेतू प्रेमाचे प्रतीक आहे; त्याचा अभिमान बाळगा- बड्या गायकाने मांडलं मत
दोन रुपयांच्या ‘या’ शेअरनं दिला जबरदस्त परतावा; 1 लाखाचे केले तब्बल 13 कोटी रुपये…
IPL चा सामना सुरू असताना त्या कपलला रहावले नाही; स्टेडियममध्येच चालू केला किसिंग सीन, VIDEO झाला व्हायरल
३५ लाख लोक उपासमारीने मेले तेव्हा शहाजहानने ताजमहाल बनवला; या गायकाने केला खुलासा