जिद्दीला सलाम! ११ वर्षांची चिमुकली भावाला मांडीवर घेऊन बसते शाळेत, फोटो पाहून तुमचेही डोळे पाणावतील

रविवारी मणिपूरमध्ये राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा तिला पाहून सगळेच भावूक झाले. कदाचित असे कोणी असेल ज्याचे डोळे ओले झाले नाहीत. Meiningsinliu Pamei नावाची ही मुलगी अवघ्या 11 वर्षांची आहे. तिच्या भावाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आहे आणि तिला तिचा अभ्यासही सोडायचा नाही. त्यामुळे ती तिच्या भावाला घेऊन शाळेत जाते.(An 11-year-old girl carries her brother on her lap and attends school)

11 वर्षांच्या मॅनिंगसिल्यू पामेईच्या हातात एक बाळ आहे. ती खुर्चीवर बसली आहे आणि डेस्कवर ठेवलेल्या नोटबुकमध्ये काहीतरी लिहित आहे. तिचा भाऊ तिच्या मांडीवर झोपला आहे. ही मुलगी दुर्गम झेलियनग्रॉन्ग नागाबहुल तामेंगलाँग जिल्ह्यातील आहे. तिचे आई-वडील शेतात कामाला जातात. ती डेलॉन्ग व्हिलेजमधील स्वायत्त जिल्हा परिषद संचालित डेलॉन्ग प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ची विद्यार्थिनी आहे.

चार भावंडांमध्ये मॅनिंगसिल्यू सर्वात मोठी आहे. आई-वडील कामावर गेल्यावर घराची आणि लहान भावंडांची जबाबदारी तिच्यावर येते. ती तिच्या लहान भावंडांच्या जीवावर तिच्या सर्वात लहान भावाला सोडून जाऊ शकत नाही, म्हणून ती त्याला सोबत घेऊन जाते. मुलगी शाळेचा गणवेश घालते. पाठीवर दप्तर लटकवते आणि भावाला उचलून घेऊन पायीच शाळेत जाते.

मुलीचे समर्पण पाहून लोकांनी तिचे खूप कौतुक केले आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी बालगृहात चाइल्डलाइन सेवा दल पाठवले. या टीमने एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत मुलीला मदत केली. कुटुंबाला तात्काळ मदत म्हणून रेशन देण्यात आले.

कॅबिनेट मंत्री बिस्वजित सिंह यांनी मुलीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. रोंगमेई नागा स्टुडंट्स ऑर्गनायझेशन, मणिपूर (RNSOM) ने मॅनिंगसिल्यूच्या कुटुंबाला 11,000 रुपयांची आर्थिक मदत दिली. असे अनेक कुटुंब आपल्याला पाहायला मिळतील जिथे आई-वडीलांना भूक भागवण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करावे लागते आणि त्यामुळे लहान भावंडांची जबाबदारी मोठ्या भावंडांवर येऊन पडते.

महत्वाच्या बातम्या-
लवकरच अंकिता लोखंडेच्या घरीही हालणार पाळणा? लॉकअपमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली..
हत्या करून मृतदेह लोखंडी पाईपला लटकावला; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं!
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले हे फोटो पाहून २२ कोटी श्रीलंकन नागरिक संतापले, दिल्या अशा प्रतिक्रिया
कोल्हापूरमध्ये प्रचार करत असताना अज्ञात व्यक्तीने माझा पाठलाग केला, मी ज्या ज्या ठिकाणी सभा घेते त्या ठिकाणी