Share

IPL चा सामना सुरू असताना त्या कपलला रहावले नाही; स्टेडियममध्येच चालू केला किसिंग सीन, VIDEO झाला व्हायरल

मुंबई। सध्या आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. क्रिकेट प्रेमींचे आवडते आयपीएलचे सामने चांगलेच रंगतांना दिसत आहेत. तसेच अनेक क्रिकेट प्रेमींनी स्टेडियममध्ये जाऊन आपल्या आवडत्या टीमला तसेच टीममधील आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तसेच काहींनी घरी बसून त्या सामन्याचा आनंद लुटला.

काल झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात टायटन्स विजयी झाले असून त्यांनी १४ धावांनी दिल्ली कॅपिटल्सला तोंडावर पाडले. या सामन्यात शुभमन गिल, मोहम्मद शमी, रशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन यांनी धडाकेबाज कामगिरी केली. तर दिल्ली कॅपिटल्सला हार मानून परत जावे लागले.

एकीकडे गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना चांगलाच रंगला होता, तर दुसरीकडे एका कपलचा रोमान्स भलताच रंगला होता. स्टेडियममध्ये आयपीएलचा सामना सुरु असतांना या कपलने एकमेकांना किस केले. त्यांचे हे कृत्य स्टेडियममधील एका कॅमेरामॅनने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

आयपीएलच्या सामन्यादरम्यान असे अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होता असतात. स्टेडियममधील अनेक लक्षवेधी चेहरे नेहमीच व्हायरल होतात. मात्र या कपलचा हा किसिंग व्हिडीओ भलताच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर आयपीएलच्या या सामन्याची चर्चा कमी आणि या कपलची चर्चा जास्त होतांना दिसत आहे. तसेच अनेक स्तरातून या व्हिडीओवर कंमेंट्सचा वर्षाव होतांना दिसत आहे.

स्टेडियममध्ये समोर गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना चालू होता तेव्हा हे कपल कोणाचाही विचार न करता एकमेकांना किस करत होते. शेजारी बसलेल्या प्रेक्षकांनी देखील लाजेने मान फिरवली. हे कृत्य कॅमेरामॅनच्या लक्षात येताच त्याने हे दृश्य टीव्हीवर आणले. घरी बसलेल्या प्रेक्षकांनी देखील आयपीएलच्या सामन्याबरोबरच या कपलचा भलताच रोमान्स पहिला.

महत्वाच्या बातम्या:  

३५ लाख लोक उपासमारीने मेले तेव्हा शहाजहानने ताजमहाल बनवला; या गायकाने केला खुलासा

यशपासून संजय दत्तपर्यंत, KGF 2 साठी कलाकारांनी घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी, वाचून डोळे फिरतील

रशिया-युक्रेन युद्धात भारताने घेतलेला ‘हा’ निर्णय ठरला गेमचेंजर, अचानक लागल्या नेत्यांच्या रांगा

कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू, सेनेच्या वाघाने फोडली डरकाळी

 

 

 

इतर खेळ

Join WhatsApp

Join Now