गेल्या एका महिन्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. या युद्धाच्या दरम्यान सगळ्या देशांनी युक्रेनची बाजू घेतली. या युद्धात नेमकी कोणाची बाजू घ्यावी, असा प्रश्न भारतासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे भारत अडचणीत देखील सापडला होता.(in russia ukren war this descision gives profit to india)
अमेरिकेसह काही देशांनी रशियावर निर्बंध लादले होते. भारताने देखील रशियावर व्यापारी निर्बंध लादावेत, यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात होता. पण तरी देखील भारताने रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भात तटस्थ भूमिका घेतली आहे. तसेच रशियावर निर्बंध लादण्यास विरोध केला. या भूमिकेचा भारताला फायदा होताना दिसत आहे.
कारण या भूमिकेमुळे भारताने रशियाचा विश्वास जिंकला आहे. तसेच या युद्धासंदर्भात तटस्थ भूमिका घेतली म्हणून कोणत्याही देशाने भारतावर व्यापारी निर्बंध लादले नाहीत. अमेरिकेने देखील भारताच्या बाबतीत कोणतीही कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी भारताने रशियाकडून कमी किंमतीत कच्चे तेल खरेदी केले होते.
यावरून अमेरिकेने भारताला सुनावले होते. चीनने आक्रमण केल्यास रशिया तुमच्या बाजूने उभी राहील अशी अपेक्षा अजिबात ठेऊ नका, अशा शब्दांत अमेरिकेने भारताला बजावले होते. पण अमेरिकेच्या कारवाईची पर्वा न करता भारताने रशियासोबत व्यापारी संबंध कायम ठेवले. याचा भारताला फायदाच झाला आहे.
भारताचे रशियासोबत पूर्वीपासूनच संबंध चांगले आहेत. भारत आणि रशिया हे मित्रराष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात ओळखले जातात. यामुळे युद्धादरम्यान युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करणे सोपे झाले. तसेच इतर देशांनी निर्बंध लादल्यामुळे रशियाकडून भारताला कमी किंमतीत कच्चे तेल खरेदी करता आले.
गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांचे महत्वाचे नेते आणि अधिकारी भारत दौऱ्यावर येत आहेत. चीन, अमेरिका आणि ब्रिटन या महत्वाच्या देशांच्या अधिकाऱ्यांनी या भेटीदरम्यान भारतीय परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे. त्यामुळे भारताच्या तटस्थ भूमिकेचा आगामी काळात देखील फायदा होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू, सेनेच्या वाघाने फोडली डरकाळी
बेस्ट मल्टीबॅगर स्टॉक! अवघ्या 5 महिन्यात ‘या’ शेअरने 1 लाखाचे केले 94 लाख, गुंतवणूकदार मालामाल
फिल्म इंडस्ट्रीमधल्या आणखी एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, बिग बॉस विजेत्यासह १४२ जणांना अटक