महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला. याचबरोबर राज ठाकरे काय भाषण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे काय भुमिका घेतात याची एकच चर्चा सुरु होती.
असे असतानाच राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. याचबरोबर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, “शरद पवारांनी जातीवाद पसरवला असं म्हणता…पण सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्या चरणाशी तुम्हीदेखील जात होतात. कशासाठी इतक्या मोठ्या माणसांवर बोलायचं. तेवढ्यापुरच्या टाळ्या मिळतात पण त्यादेखील प्रायोजित आहेत”.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा होता अशी जहरी टीका यावेळी संजय राऊतांनी केली. ‘तुम्हाला एवढं उशिरा कसं आठवलं? थोडसं आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? त्याचा आता अभ्यास करावा लागेल, असा खोचक सवाल राऊत यांनी केला.
तसेच ‘अडीच वर्षानंतर बोलत आहात. भाजप आणि शिवसेनेत काय झालं ते आम्ही पाहू. तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही आत यायची. आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्ही तुमचं पाहा, काल शिवाजी पार्कात भाजपचाच भोंगा सुरू होता. त्यांचीच स्क्रिप्ट होती, असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लक्ष केले.
दरम्यान, शरद पवारांनी जातीवाद पसरवला म्हणता. अहो, पवारांच्या चरणाशी तुम्हीही जात होतात सल्लामसलत करायला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही टोलेजंग माणसं आहेत. त्यांच्यावर कशाला बोलता, असं राऊत म्हणाले. दरम्यान राज यांच्या भाषणानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुलीच्या मृत्युनंतर वडिलांच्या संपत्तीवर जावयाचा आणि नातवांचा हक्क; न्यायालयाचा मोठा निर्णय
मलायका अरोराच्या गाडीला भीषण अपघात; 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या, दुखापत झाल्याने अभिनेत्री रुग्णालयात दाखल
युपीएचं अध्यक्षपद घेणार का? पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले “मी नेतृत्व करण्याची…”
चिमुकल्याच्या टॅलेंटवर आनंद महिंद्रा झाले फिदा, मासेमारीसाठी केलेला जुगाड पाहून केलं कौतुक, पाहा VIDEO