Share

सलाम! अनुपम खेर यांनी ‘या’ काश्मिरी पंडित कुटुंबाला घेतलं दत्तक, मुलीच्या लग्नाचा खर्चही उचलणार

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर यांनी केलेल्या भूमिकेचं भरभरून कौतुक होत आहे. असे असताना अनुपम खेर यांच्याबाबत अजून एक बातमी समोर आली आहे की, त्यांनी एका गरीब काश्मिरी कुटुंबाला दत्तकही घेतलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या कामाची प्रचंड चर्चा होत आहे.

अनुपम खेर यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे. अनुपम यांना अभिनयासाठी दोन वेळा राष्ट्रीय तर आठ वेळा फिल्मफेअर अँवॉर्ड मिळाला आहे. सध्या त्यांचं ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील अभिनयासाठी भरभरून कौतुक होत आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. यात 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कहाणी सांगण्यात आली आहे. यावेळी काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख संघर्ष यावर प्रकाश टाकण्याचे काम चित्रपटात केलं आहे.

अनुपम खेर कायम काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर बोलत असतात. भलेही अनुपम यांचा जन्म सिमल्याचा आहे. तरी देखील काश्मिरी पंडितांबद्दल त्यांना आत्मियता आहे. या सिनेमातून अनुपम यांनी काश्मिरी पंडितांची बाजू मांडली आहे. अनुपम यांनी केवळ सिनेमातून सहानुभूती दाखवली आहे असं नाही तर त्यांच्यासाठी ते मदतही करत आहेत.

माहितीनुसार, अनुपम खेर यांनी अत्यंत गरीब काश्मिरी पंडित कुटुंबाला दत्तक घेतलं आहे. हे कुटुंब दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जादरू गावात राहते. या कुटूंबात अशोक कुमार रैना, त्यांची पत्नी आणि तीन मुलींचा समावेश आहे. या कुटुंबाला 1990 मध्ये काश्मीर खोऱ्यात उफाळलेल्या दहशतवादामुळे घर सोडून पलायन करावं लागलं होतं.

त्यानंतर त्यांचं कुटुंब काही दिवस नातेवाईकांवर अवलंबून होतं. कुटुंबाची स्थिती पाहून, अनुपम खेर यांनी या कुटुंबाला दत्तक घेतलं. इतकंच नाही तर अशोक यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाचा खर्च देखील उचलणार आहेत. अनुपम खेर यांना एका मुलाखतीत या संदर्भात प्रश्न केला असता म्हणाले की, मला या कुटुंबानं रस्त्यावर भीक मागत फिरणं मान्य नव्हतं.

मनोरंजन बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now