Share

आमदारांच्या घराचे स्वप्न भंगणार, सरकार आमदारांना देणार धक्का? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

ajit pawar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांना 300 घरे देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेला भाजप आणि मनसेने विरोध केला होता. तर महाविकास आघाडी सरकारमधील काही कॉंग्रेस नेत्यांनी घरं घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

तसेच राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असलेल्या म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतून ही घरे देण्यात येणार होती. या निर्णयाला सामान्यांनी विरोध सुरु करताच ही घरे फुकट देणार नसल्याचे मंत्री आव्हाड यांनी नंतर सारवासार केली होती. विरोधकांनी देखील या निर्णयावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

असे असतानाच आता हा निर्णय मागे घेणार असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तशी माहिती दिली. या निर्णयाबाबत कारण नसताना गैरसमज होत असतील तर तो थांबविण्याचा विचार केला जाईल, असे अजित पवारांनी स्पष्ट सांगितले.

याबाबत बोलताना ते म्हणाले, “आमदारांना घरं देण्यासंबंधी चुकीचा संदेश गेला. ती घरं काही मोफत नाही आहेत. ज्याप्रमाणे म्हाडामध्ये वेगवेगळ्या लोकांना घरं दिली जातात, काहींसाठी घरं राखीव असतात त्याचप्रमाणे ज्या आमदारांचं मुंबईत अजिबात घरं नाही अशांना त्याचे पैसे मोजून घरं दिलं जाणार असं जाहीर केलं होतं.’

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘एखादा निर्णय घेतल्यानंतर कारण नसताना गैरसमज निर्माण होत असतील तर तो निर्णय थांबवलाही जातो. तसेच घरं मोफत दिली जाणार नाहीत. ठरवलेल्या किंमतीतच घरं दिली जातील. पण इतका विरोध होत असेल तर कदाचित तसं होणार नाही.”

दरम्यान, ‘पूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून घरे लोकप्रतिनिधी, कलावंत, पत्रकार, आदींना घरे दिली जात असत. ती योजना नंतर बंद करण्यात आली असल्याचे अजित पवारांनी सांगितले. आता म्हाडाकडून वेगवेगळ्या कोट्यात घरे दिली जातात. त्यातच आमदारांना घरे देण्याची योजना होती, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

महत्त्वाच्या बातम्या
हे काहीतरी विचित्रच! 3 दुकानं फोडली पण चोरले अवघे 20 रुपये; कारण वाचून कपाळावर माराल हात
हिमालया कंपनी वादाच्या भोवऱ्यात, प्रॉडक्ट्समध्ये हलालचा वापर? लोकांनी टाकला बहिष्कार
स्टॉक छोटा फायदा मोठा! २ रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना होणार २०० टक्के फायदा, पडणार पैशाचा पाऊस
पतीला झालेल्या कॅन्सरविषयी अभिज्ञा भावेने दिली मोठी अपडेट; भावूक होत म्हणाली…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now