बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या अफेअर्समुळे खूप चर्चेत असतो. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) या अभिनेत्रींसोबतचे सलमान खानचे अफेअर नेहमीच चर्चेत राहिले आहे. खासकरून सलमान आणि ऐश्वर्याचे नाते तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा सलमानने ऐश्वर्याला दारूच्या नशेत मारहाण केल्याचे वृत्त आले होते. आता त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीही (Somy Ali) असाच आरोप करत असल्याचं दिसत आहे.(Salman Khan was threatened by his ex-girlfriend)
वास्तविक सोमी अलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सलमान खान आणि भाग्यश्री यांच्या मैने प्यार किया या चित्रपटातील दृश्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीन शॉटसह सोमी अलीने लिहिले की, ‘बॉलिवूडचा हार्वी वीन्सटीन, एक दिवस तुझही सत्य उघड होईल. तू ज्या महिलांवर अत्याचार केलेत त्या एक दिवस बाहेर येतील आणि त्यांचे सत्य सांगतील. जसे ऐश्वर्या राय बच्चनने केले.
हार्वे वेनस्टीन हा एक प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट निर्माता आहे. हार्वे याच्यावर बलात्कार, मारहाण, लैंगिक अत्याचार आणि धमक्या दिल्याचा आरोप आहेत. हे आरोप एक, दोन नव्हे तर अनेक महिला आणि अभिनेत्रींनी केले होते. यामध्ये केट ब्लँकेट, लिसा कॅम्पबेल, अवा ग्रीन, अँजेना जोली या प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश होता. त्यानंतर हार्वे वाइनस्टीनला न्यायालयाने 23 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
एकेकाळी ऐश्वर्या राय आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. सलमानवर आरोप झाले होते की तो ऐश्वर्या रायला दारूच्या नशेत मारहाण करायचा आणि तिला फोनवरून धमकावत असे. मात्र, सलमान नेहमीच असे सर्व आरोप फेटाळत आला आहे.
सोमी अली ही पाकिस्तानी वंशाची अमेरिकन नागरिक आहे. सोमीला सलमान खानची खूप आवड होती आणि त्यामुळेच ती वयाच्या 16 व्या वर्षी मुंबईत आली होती. सोमी सलमानची गर्लफ्रेंड बनली पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. 1999 मध्ये हे नाते पूर्णपणे संपुष्टात आले, त्यानंतर सोमी अमेरिकेला परतली. यानंतर सोमीने आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता ती एनजीओ चालवते.
सोमी अलीची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. 2018 मध्ये #MeToo चळवळीदरम्यान, सोमीने पीडित महिलांना पाठिंबा दिला होता आणि तिच्या लैंगिक शोषणाची कथा देखील शेअर केली होती.
महत्वाच्या बातम्या-
राजकीय भूकंप होणार? भाजपा खासदार आणि संजय राऊतांमध्ये ३ तास खलबत; नेमकं काय घडतंय?
कौतुकास्पद! दीपिका पादुकोणने विदेशात वाढवला भारताचा मान; मिळवला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
या मुस्लिम व्यक्तीने लटकावला पशुपतिनाथ मंदिरात ३७०० किलोचा सर्वात मोठा घंटा, मोठे-मोठे इंजिनीअर झाले फेल
पुन्हा लग्नबंधनात अडकणार UPSC टॉपर टीना डाबी, जाणून घ्या कोण बनणार नवरदेव