ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील एका नामांकित रुग्णालयात सिझरियन प्रसुतीदरम्यान महिलेच्या पोटात कापडी मॉप राहिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे महिलेवर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. या घटलेल्या प्रकारानंतर रुग्णालयातील चार जणांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय मृण्मयी दिवेकर यांना प्रसूतीसाठी वर्तकनगर परिसरातील नामांकित रुग्णालय ज्युपिटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची प्रसुती सिझेरियन पध्दतीने करण्यात आली. थोड्या दिवसातच त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र घरी येईनही मृण्मयी यांच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे या वेदना त्यांना असाह्य होऊ लागल्या.
यामुळे त्यांनी सर्जन डॉक्टर अशुतोष आजगावकर यांच्याशी संपर्क साधला. परंतु त्यांच्या या गोष्टीकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. डॉक्टरांनी मृण्मयी यांना गोळ्या न देता दुसरी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याच्या आधारे मृण्मयी यांची दुसरी शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेत मृण्मयी यांच्या पोटात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कापडी मॉप राहिल्याचे आढळून आले.
या मॉपमुळे मृण्मयी यांच्या पोटामधील आतडी, अंडाशय तसंच अंडाशयाची उजवी नळी चिकटून गंभीर स्वरुपाची दुखापत झाली होती. याकारणाने त्यांची उजवी नळी काढून टाकण्यात आली. फक्त डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृण्मयी यांनी सर्व त्रास सहन करावा लागला. जर लवकर हा मॉप काढण्यात आला नसता तर ते मृण्मयी यांच्या जीवावर बेतले असते.
दरम्यान या सर्व प्रकरानंतर पोलिसांनी सर्जन डॉ. आशुतोष आजगावकर, असिस्टंट सर्जन डॉ. सुप्रिया महाजन, भूलतज्ञ डॉ. चिन्मयी गडकरी आणि ऑपरेशन थेटर मधील नर्स यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच घटनेच्या पुढील तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे. ज्युपिटर रुग्णालयातील व्यवस्थापकांच्या माहितीनुसार, बाळाच्या हृदयाचे ठोके झपाट्याने कमी होत असल्याने महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये त्वरीत घेऊन जाण्यात आले होते.
या शस्त्रक्रियेत आई आणि बाळाच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले होते. बाळाचा जन्म झाल्यानंतर महिलेचा प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तो थांबवण्यासाठी डॉक्टरांनी हिस्टेरेक्टॉमी/गर्भाशय काढून टाकणे प्रतिबंधित करण्यासाठी आपत्कालीन उपाय करण्यात सुरुवात केली. शेवटी या दोघांचे प्राण वाचविण्यास डॉक्टरांना यश आले. परंतु या गडबडीत महिलेल्या पोटात डॉक्टरांकडून मॉप तसाच राहिला. ज्यामुळे हे प्रकरण त्यांच्या इतके अंगलटी आले.
महत्वाच्या बातम्या
RRR ची कमाई पाहून सलमान आला टेंशनमध्ये; म्हणाला, बाॅलीवूडचे चित्रपट साऊथमध्ये का चालत नाहीत?
…तर रशिया आण्विक हल्ला करणार; प्रमुख नेत्याने दिलेल्या जाहीर धमकीने जगात घबराट
मोहम्मद शमीच्या प्रेमात पडली ‘ही’ अमेरिकन पॉर्नस्टार, म्हणाली, ‘खुप छान कामगिरी केली’
तरुणांच्या हाती सूत्र देणं काँग्रेसला महागात पडलं; कॉंग्रेस नेत्यानेच केली कानउघाडणी