सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जवळपास 1M वेळा पाहिला गेला आहे. आनंद महिंद्रा यांचे ट्विट समोर येताच, हा व्हिडिओ क्षणार्धात सोशल मीडियावर पसरला. इतकंच नाही तर या व्हिडीओमध्ये दिसणार्या व्यक्तीलाही आनंद महिंद्राच्या मनातील गोष्ट आवडली आहे.(Cycling wins Anand Mahindra’s heart)
दोन्ही हात सोडून एक व्यक्ती डोक्यावर ओझे घेऊन कशी सायकल चालवत आहे, हे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. त्याने सायकलचा इतका समतोल साधला आहे की माणूस दोन्ही हात न लावता एवढी सायकल चालवू शकतो यावर विश्वास बसत नाही, तेही डोक्यावर मोठा भार असताना आणि रस्ता वळणाचा असताना. व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
This man is a human Segway, with a built in gyroscope in his body! Incredible sense of balance. What pains me, however, is that there are so many like him in our country who could be talented gymnasts/sportspersons but simply don’t get spotted or trained… pic.twitter.com/8p1mrQ6ubG
— anand mahindra (@anandmahindra) March 29, 2022
या व्हिडिओने आनंद महिंद्रा यांना खूप प्रभावित केले आहे. या माणसाच्या प्रतिभेवर ते खूप खूश आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा माणूस human segway आहे, म्हणजे एक प्रकारची स्कूटर. यामध्ये गायरोस्कोप म्हणजे एक प्रकारचे सेन्सर शरीरात आधीच बसवलेले असते. किती छान समतोल साधला आहे. मला वाईट वाटते की आपल्या देशात असे बरेच प्रतिभावान असतील परंतु त्यांना ओळखणे आणि नंतर त्यांना प्रशिक्षण देणे सोपे नाही.
एका वापरकर्त्याने आनंद महिंद्रा यांना एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचे सुचवले आहे, जेथे लोक त्यांचे व्हिडिओ अपलोड करू शकतात. त्यात वेगवेगळ्या श्रेणी असाव्यात. दर महिन्याला, प्रत्येक श्रेणीतून सर्वोत्तम 3 निवडले जावेत. आनंद महिंद्रा यांना ही सूचना खूप आवडली आहे. त्यांनी इतरांना विचारले आहे की, ही प्रस्ताव कसा वाटला, यूट्यूबवर एक प्लॅटफॉर्म बनवला पाहिजे?
व्हिडिओ फार मोठा नाही, जेव्हा सायकलवरचा माणूस रस्त्यावरून बाहेर पडतो आणि गावाकडे वळतो तेव्हा व्हिडिओ अचानक संपतो. ट्विटर वापरकर्त्यांनी तरुण सायकलस्वाराच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांच्यापैकी काहींनी असे म्हटले की व्हिडिओने त्यांना त्यांच्या बालपणाची आठवण करून दिली.
हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केल्यापासून त्याला चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. जवळपास 66 हजार लाईक्स आणि आठ हजारांहून अधिक रिट्विट्स आहेत. एका यूजरने लिहिले की, अशी रत्ने शोधण्यासाठी आम्हाला गावोगावी जावे लागेल. याशिवाय एकाने लिहिले की, मी जे पाहले त्यातील रस्ते इतके चांगले नाही. खड्डय़ांची चिंता न करता तो टॅलेंटसह स्वत:चा सहज समतोल साधत आहे.
महत्वाच्या बातम्या-
राजकीय भूकंप होणार? भाजपा खासदार आणि संजय राऊतांमध्ये ३ तास खलबत; नेमकं काय घडतंय?
कौतुकास्पद! दीपिका पादुकोणने विदेशात वाढवला भारताचा मान; मिळवला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
या मुस्लिम व्यक्तीने लटकावला पशुपतिनाथ मंदिरात ३७०० किलोचा सर्वात मोठा घंटा, मोठे-मोठे इंजिनीअर झाले फेल
पुन्हा लग्नबंधनात अडकणार UPSC टॉपर टीना डाबी, जाणून घ्या कोण बनणार नवरदेव