ठाकरे सरकार एका वेगळ्या प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्तेतील नेते हे वेगवेगळ्या कारणांनी चांगलेच चर्चेत आहेत. ‘ठाकरे सरकार’मधील मंत्र्यांना भर कार्यक्रमात तलवारी दाखवणं चांगलच महागात पडलं आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईत एक जाहीर कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे देखील सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मंचावर आपल्या हातात तलवार घेतली होती.
तलवारीसह या दोघांचे फोटो सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाले आहे. त्यानंतर भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याबाबत भाजप नेते मोहित कंबोज यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
अखेर भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख आणि इम्रान प्रतापगढी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
बॉम्बे पोलीस आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याचबरोबर मोहित कंबोज यांनी ट्वीट करत गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे. वांद्रे तलवार घटनेच्या माझ्या तक्रारीवरून मंत्री अस्लम शेख, मंत्री वर्षा गायकवाड आणि इतर काँग्रेस नेत्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन सुमारे 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून होणाऱ्या दादागिरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सत्तेचा माज आलाय का? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
नातेवाईक पाठलाग करत असल्याचे पाहताच प्रेमीयुगुलाने उचलले धक्कादायक पाऊल, झाला भयानक शेवट
विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासा; ठाकरे सरकार कोरोनाकाळात दाखल झालेले सर्व गुन्हे घेणार मागे
निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि.., गडकरींनी व्यक्त केली इच्छा
कृषी पर्यटनाची गरज शेतकऱ्यांना व पर्यटकांना – गणेश चप्पलवार