Share

गुन्हेगारीने गाठला कळस! पुण्यात भांडणं सोडवायला गेलेल्या पोलिसावरच कोयत्याने केले सपासप वार

पुणे शहर हे गुन्हेगारांचे आणि दहशतीचे शहर बनत चालले आहे. येत्या काही दिवसांमध्ये पुण्यात अनेक अशा घटना घडल्या आहेत, ज्यावरून दिसून येत आहे की पुण्यातील गुंडांना, गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाच धाक राहिला नाही. पुण्यातून आता एक धक्कादायक घटना समोर येत आहे, भांडणं मिटवण्यासाठी मध्ये पडलेल्या पोलिसावरच टोळक्यातील तरुणांनी कोयत्याने हल्ला केला आहे.

संबंधित घटना ही कात्रज चौकात घडली आहे. किरकोळ वादावादीतून टोळक्याने तरुणावर हल्ला केला. या तरुणांचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या ड्युटीवरील वाहतूक पोलिसावरही टोळक्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेने आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं होतं.

या प्रकरणी आता आरोपी कैफ आरिफ शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याचं वय 18 वर्ष आहे. तो कात्रज येथील संतोष नगर मधील रहिवासी आहे. ज्या तरुणावर हल्ला करण्यात आला त्याचे नाव प्रीतम माधव लोणकर असे असून, तो 30 वर्षांचा आहे. त्याने आरोपी विरोधात कात्रज पोलिसात फिर्याद दिली आहे.

घडलेली घटना म्हणजे, फिर्यादी प्रितम लोणकर हा त्याच्या मित्रांसोबत चहा पिण्यासाठी कात्रज चौकातील गणेश हॉटेल मध्ये गेला होता. यावेळी, गाडी पार्क करीत असताना एका मुलाने त्यांच्याबरोबर वाद घालून शिवीगाळ केली. नंतर हा वाद वाढला. मुलाने मी कोण आहे दाखवतो म्हणत, त्याच्या मित्रांना घेऊन आला.

वादाने मारामारीचे रूप धारण केले होते. ज्या मुलाने मित्र बोलावले, त्यांनी प्रीतमला मारायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी मुल्ला व संकेत या दोघांनी प्रितमला पकडून ठेवले. कैफ याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने लोणकर यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला.

घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं. मदतीला आसपासचे कोणीही यायला तयार नव्हते. कोयत्याने वार करत असताना, प्रीतमच्या उजव्या हाताच्या करंगळीवर कोयता लागला आणि तो जखमी झाला. संबंधित घटनेची माहिती कात्रज चौकात वाहतूक पोलिसांच्या ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई मनोज बदडे यांच्यापर्यंत पोहोचली.

त्यांनी तात्काळ घटनेच्या ठिकाणी जाऊन भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न सुरु असतानाच आरोपी कैफ आरिफने त्यांच्या हातावर कोयत्याने वार करत त्यांनाही जखमी केले. या घटनेनंतर प्रितमने फिर्याद दिल्यावर कात्रज चौक पोलिसांनी आरोपी कैफ आरिफ शेख याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

क्राईम

Join WhatsApp

Join Now