क्रिकेट (Cricket) हा आता फक्त पुरुषांचा खेळ राहिलेला नाही. आता महिलाही या खेळाचा खूप आनंद घेताना पाहायला मिळतात. क्रिकेट खेळण्याची आवड महिलांमध्येही पूर्वीपेक्षा जास्त दिसून येते. यावेळी चाहत्यांनाही महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाहण्यात मोठी उत्सुकता आहे. पण खेळाची खरी आवड असेल तर पुरुष काय आणि स्त्री काय.
इतर खेळांप्रमाणे क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष एकत्र क्रिकेट खेळणे शक्य नाही का, असे प्रश्न यापूर्वीही उपस्थित झाले आहेत. आता क्रिकेटचा देव म्हटले जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) असाच सल्ला दिला आहे. ज्यावर प्रतिभावान अभिनेता फरहान अख्तरही (Farhan Akhtar) सहमत होताना दिसत आहे. सचिनच्या मुले आणि मुली एकत्र क्रिकेट मॅच खेळण्याच्या गोष्टीवर अभिनेत्याने दुजोरा दिला आहे.
सचिनने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ मुंबईच्या एमआयजी क्लबचा आहे. व्हिडिओमध्ये महिला खेळाडू गोलंदाजी करताना आणि पुरुष खेळाडू फलंदाजी करताना दिसत आहे. व्हिडिओसोबत सचिनने लिहिले आहे की, मुले आणि मुली एकत्र क्रिकेट मॅच खेळताना पाहणे खूप छान वाटते. खेळ हे समानतेचे उत्तम माध्यम होऊ शकते. हे मी नुकतेच मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये पाहिले.
https://twitter.com/FarOutAkhtar/status/1507306789490262021?s=20&t=JdH6-Q0pYueMUohcdfz46A
यावर टिप्पणी करताना बॉलीवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरने लिहिले आहे की, @sachin_rt मी तुमच्या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत आहे. मिश्र (मुल-मुली) संघ T20 विश्वचषक असावा. यावर @ICC चे मत काय आहे? आता फरहानने सचिनच्या सूचनेला एका पातळीवर नेऊन थेट आयसीसीलाच प्रश्न विचारला आहे.
सध्या तरी आयसीसीकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देण्यासाठी नेहमीच सज्ज असतात. एका चाहत्याने लिहिले आहे की, ही एक चांगली कल्पना आहे. दुसर्या व्यक्तीने लिहिले आहे, कल्पना बरोबर आहे पण आता तसे सांगणे खूप घाई केल्यासारखे होईल.
आणखी एका व्यक्तीने सुचवले आहे की, त्याची सुरुवात आधी आयपीएलने करावी. खर पाहता नजीकच्या भविष्यात त्याची शक्यता खरोखर कठीण आहे परंतु अशक्य नाही. काय माहीत काही वर्षांनी आपल्याला महिला आणि पुरुष क्रिकेटपटू एकत्र क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. एक क्रिकेटप्रेमी म्हणून तुमच काय मत आहे?
महत्त्वाच्या बातम्या
द फॅमिली मॅन 3 मध्ये असणार जबरदस्त ससपेन्स, मनोज वाजपेयी यांनी दिली ‘ही’ महत्वाची अपडेट
मला तुरुंगात टाका मी जायला तयार आहे, पण कुटुंबाची बदनामी कशाला करताय? मुख्यमंत्री संतापले
‘RRR बनवल्याबद्दल त्यांनी ६ महिने तुरूंगवास भोगावा’, अभिनेत्याने राजामौलींची उडवली खिल्ली
भारत घडवणार मोबाईल क्रांती; चीनी-व्हिएतनाम नाही, आता भारताने बनवलेले मोबाईल वापरणार लोकं