द्राक्षे बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी, राज्य सरकारने यासाठी मोठी किराणा दुकाने अथवा सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद सुरू झाला आहे.
तसेच भाजपने देखील राज्य सरकारवर या मुद्यावरुन चांगलच धारेवर धरल. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी उपोषणाची घोषणा केली होती. विधिमंडळ अधिवेशनात देखील विरोधकांनी सुरू केलेल्या आरोपांचे पडसाद उमटले.
वाइनविक्रीस परवानगी हा मुद्दा विरोधकांनी अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिली. दारू घ्यायचीच असेल तर घेणारा कुठूनही शोधून काढतो, हे सांगताना अजितदादांनी टोलेबाजी केली.
याबाबत बोलताना ते म्हणाले. ‘मी अनुभव घेतलाय.. पेताड तो कुठल्याही गावात असू द्या, आपल्याला त्या गावातली दारूची दुकानं माहिती नसतात. तरी ते पेंगतच येतंय रात्री. त्याला विचारलं कसं रे? तर म्हणतो आलो जाऊन,’ असे अजितदादांनी म्हंटले सोबतच दारू पिणाऱ्या व्यक्तीची देखील नक्कल करून दाखवली.
दरम्यान, ‘जनतेला जर ते नको असेल, तर आमची आग्रहाची भूमिका अजिबात नाही. नागरिकांना नको त्या सवयी लागाव्यात, वेगळा समाज निर्माण व्हावा अशी भावना कुणाचीही नसते”, असे अजित पवार यांनी स्पष्ट करत विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर दिली.
याचबरोबर सुपमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास जर संबंधित दुकान-मालकाचा विरोध असेल, तर तिथे या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार नसल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच ज्या दिवशी जन्माला आलो, तेव्हापासून आजपर्यंत एका थेंबाला स्पर्श केला नाही हे सगळ्यांना माहिती आहे, असेही अजितदादा म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
अंबानींनी दिला रिलायन्सचा राजीनामा! संचालक पदावरून पायउतार; धक्कादायक कारण आले समोर
नागाचैतन्य विरोधात संमथाने उचलले आणखी एक कडक पाऊल; नंतर म्हणाली एक छोटीशी ठिणगी…
द फॅमिली मॅन 3 मध्ये असणार जबरदस्त ससपेन्स, मनोज वाजपेयी यांनी दिली ‘ही’ महत्वाची अपडेट
RRR review: प्रेक्षकांनी चित्रपटाला ‘ब्लॉकबस्टर’ घोषित केलं, शिट्ट्यांनी आणि टाळ्यांनी गडगडले थिएटर