करिश्मा तन्नाने लग्नाच्या एक महिन्यानंतर केला हैराण करणारा खुलासा, पती पत्नीच्या नात्यातील सांगते ‘हे’ गुपीत

मागील अनेक दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात सनई चौघडे वाजू लागले होते. अनेक अभिनेत्रींचा यामध्ये समावेश आहे. अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलने लग्न केले. त्यानंतर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे, मौनी रॉयने देखील लग्न केले. त्यानंतर अभिनेत्री करिश्मा तन्नाने लग्न केले. तिच्या लग्नाला दीड महिना पूर्ण झाला आहे. तिने बॉयफ्रेंड वरुण बंगेरसोबत लग्न केले.

नुकतेच करिश्माने लग्नानंतर तिचे आयुष्य कसे चालले आहे याचा खुलासा केला आहे. करिश्मा सध्या तिच्या नवविवाहित आयुष्याचा खूप आनंद घेत आहे. तसेच करिश्मा नुकतीच एका कार्यक्रमात दिसली. यावेळी तिला विचारण्यात आले की, लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाले आहेत. या प्रश्नावर करिश्माने अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे.

याबाबत उत्तर देत करिश्मा म्हणाली की, “मिसेसचा फक्त एक टॅग आहे. पण मला वाटते की, आम्ही अजूनही एकमेकांसाठी मित्रांपेक्षा जास्त आहोत. वरुण अजूनही मला त्याची गर्लफ्रेंड म्हणतो आणि मी त्याला माझा बॉयफ्रेंड म्हणतो. त्यामुळे अजूनही आमचे तेच सुरू आहे.” करिश्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच चाहत्यांना तिचा हा बिनधास्तपणा खूप आवडला आहे.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, करिश्माचे लग्न ५ फेब्रुवारी २०२२ मध्ये झाले आहे. तिने बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्न केले. करिश्माने तिच्या लग्नाच्या फंक्शन्सचे फोटो आणि व्हिडिओही चाहत्यांसह शेअर केले आहेत. लग्नानंतरही ती सतत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

करिश्माच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने नुकतीच एमएक्स प्लेयर वेब सीरिज ‘बुलेट्स’ मध्ये काम केले आहे. याशिवाय ती मनोज बाजपेयींच्या ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटातील बसंती या आयटम नंबरमध्येही दिसली आहे. तिने यापूर्वी अभिनेता ऋत्विक भौमिकसोबत ‘कतरा’ नावाच्या म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे.