Share

समाज एकत्र असताना दुरावा निर्माण होईल असे चित्रपट करू नये; कश्मीर फाईल्सबद्दल पवारांचे परखड मत

sharad pawar

राज्यात राजकीय वातावरण तापलेल असतानाच ‘द कश्मीर फाईल्स'(The Kashmir Files) चित्रपटावरुन आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. 1990च्या काश्मीर नरसंहारावर आधारित ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन बराच राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे.

अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठे विधान केले आहे. याबाबत ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी या चित्रपटाबाबत बोलताना सविस्तर भाष्य केले आहे.

ते म्हणाले, “जेव्हा हे सर्व घडले, तेव्हा देशात काँग्रेसची सत्ता होती, हे दाखवण्यासाठी काँग्रेस पक्षाला दोष देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. तसेच हे सगळ विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे नेतृत्व करत असताना घडले. मात्र, आता या मुद्द्यावरून गदारोळ करणारे भाजपचे काही लोक त्यावेळी सिंह यांना पाठिंबा देत होते, असे पवारांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, देश एका विचाराने चाललेला आहे, समाजातील सर्व घटक एकत्र आहेत, असं असताना पुन्हा समाजात दुरावा निर्माण होईल असं लिखाण किंवा चित्रपट हे टाळलं पाहिजेत असं पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अखेर पवारांनी या चित्रपटाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, यावेळी एआयएमआयएमच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नकार देत प्रस्ताव फेटाळून लावला आहे. पवार म्हणाले, ‘एआयएमआयएमने आमच्या सोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला असला तरी देखील अशा प्रकारचा निर्णय आम्हाला घेता येत नाही. राष्ट्रीय समितीने राज्याला या संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार न दिल्याने याबाबत आम्ही भूमिका घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत तो पक्ष निर्णय नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु, ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे, असेही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
ज्या जत्रेत मुस्लिम देवीची पुजा करायचे त्याच जत्रेत त्यांना दुकाने लावण्यास बंदी, हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव
काश्मिर फाईल्समधील राधिका मेननची खरी स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? JNU मध्ये आहे प्रोफेसर
जगातील सगळ्यात घातक विष ‘सायनाइड’ची टेस्ट कशी असते माहिती आहे का? वाचा याचा वापर कधी कधी झाला?
नितेश राणेंच्या जिभेवरचा ताबा सुटला! AIMIM च्या प्रस्तावावरून अश्लील वक्तव्य, उडाली खळबळ

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now