‘द काश्मीर फाईल्स’वरून प्रकाश राज यांनी दाबली मोदींची दुखती नस; करून दिली काळ्या घटनांची आठवण

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटावर टीका होताना दिसत आहे. अनेकजण सोशल मिडीयाच्या माध्यमातून या चित्रपटाविषयी मत मांडत आहेत. नुकतीच या चित्रपटाबाबत दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी त्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ हा प्रचारकी थाटाचा चित्रपट आहे. तो जखमा भरतोय की द्वेषाची बिजं पेरतोय,’ असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, ‘प्रिय अभिनेते, जे आता निर्माते झाले आहेत.. तुम्ही या फाईलींनाही ट्विस्ट देऊन चित्रपटाच्या रुपात प्रदर्शित करणार का? या प्रश्नासोबत त्यांनी ‘गोध्रा फाईल्स, दिल्ली फाईल्स, जीएसटी फाईल्स, नोटाबंदी फाईल्स, कोव्हिड फाईल्स, गंगा फाईल्सचे फोटो पोस्ट केले आहेत.

या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. प्रकाश राज आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता देखील त्यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावर आपल्या भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या ट्विटला अनेकांनी शेअर केले आहे. तसेच चित्रपटाच्या समर्थांनी आपली बाजू मांडत प्रकाश राज यांना सुनावले आहे.

सध्या संपूर्ण देशात द काश्मीर फाईल्स चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटावर भूमिका घेणारे दोन गट सोशल मिडीयावर पडले आहेत. त्यामुळे या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता पर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. अशातच करणी सेनेने चित्रपटाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम दान करण्यास सांगितले आहे.

करणी सेनेचे प्रमुख सूरज पाल यांनी म्हटले आहे की, बहुतेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त घोषित केला आहे, जेणेकरून सर्वसामान्यांनाही तो पाहता येईल. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी पुढे येऊन चित्रपटाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम दान करावी. जेणेकरून ती रक्कम विस्थापित काश्मीरी पंडितांच्या कल्याणासाठी वापरता येईल.

करणी सेनेने दिलेल्या या सल्ल्यावर अद्याप कोणत्याही चित्रपटाच्या सदस्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. किंवा चित्रपटाच्या कमाईतून कोणतीही देणगी जाहीर केलेली नाही. मुख्य म्हणजे चित्रपटाने आतापर्यंत २६.२० कोटींची कमाई केली असून तीचा वापर कुठे करण्यात येईल हे स्पष्ट केलेले नाही.

महत्वाच्या बातम्या
शिवजयंतीच्या वादात मनसे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काढली एकमेकांची अक्कल; काय घडलं नक्की..
‘गली बॉय’ फेम रॅपर धर्मेश परमारचं दुःखद निधन; वयाच्या 24 व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास
मरण आलं पण न्याय नाही मिळाला; लेकीसाठी झगडणाऱ्या बापाचा दुर्दैवी अंत, शेवटपर्यंत प्रशासनाने केलं दुर्लक्ष
लहान मुलांच्या झोक्यावर खेळण्याची मस्ती तरुणांना पडली महागात; व्हिडिओ पाहाल तर हसून-हसून लोटपोट व्हाल