बॉलिवूड प्रसिध्द अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट असून तिनं सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे. तिनं आपला पती आनंद अहुजासोबत इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये सोनम तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.
या फोटोत ती काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. कोलो मोनोकिनीमध्ये सोनमचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. तिचा पती आनंद आहुजाच्या मांडीवर तिनं आपलं डोकं ठेवत हा फोटो काढला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी तसेच सेलीब्रेटींनी देखील प्रतिक्रिया देत शुभेच्छा दिल्या आहेत.
करीना कपूर, दिया मिर्झा, अनन्या पांडे, जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट्स करत सोनमला शुभेच्छा दिल्या आहेत. दिया मिर्झानं म्हटलं आहे, ‘ही खूप गोड बातमी दिलीस.’ तर ‘तुम्हा दोघांसाठी मी खूप आनंदी आहे’, अशी प्रतिक्रिया करीनाने दिली आहे. इतर कलाकारांनी देखील तीला शुभेच्छा दिल्या आहेत.
तिचे आणि आनंद अहुजाचे लग्न 2018 साली झालं होतं. या लग्नाला बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता तिच्या या गुड न्यूजमुळे अनेकांना आनंद झाला आहे. सोनमने पोस्ट शेअर येणाऱ्या पाहुण्याविषयी कौतूक केलं आहे. त्याच्या येण्याची ती वाट पाहत आहे.
तिनं म्हटलं आहे की, आम्ही दोघं, हृदयापासून तुला शक्य तितकं चांगलं वाढविण्यासाठी प्रयत्न करू. आमचे प्रत्येक पाऊल तुझ्याशी एकरूप होईल. आपले एक कुटुंब असेल. कुटूंबातले सगळेच तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. आम्ही तुझे स्वागत करण्यासाठी वाट पाहत आहोत.
सोनम कपूर ही 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात दिसली. यामध्ये तिनं दलकर सलमानसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘AK vs AK’ या चित्रपटात तिनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.