अलीकडे शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी दुसऱ्या देशात राहण्यासाठी जातात. सतत गावी येणं आई – वडिलांना भेटणं या मुलांना शक्य नसतं. या काळात त्यांच्यासाठी उत्तम माध्यम म्हणजे इंटरनेट. इंटरनेटच्या माध्यमातून आपण साता समुद्रापार असलेल्या नातेवाईकांशी संवाद साधतो.
याचबरोबर इंटरनेटच्या या काळात देखील एकमेकांच्या मदतीसाठी नातेवाईक तात्काळ धावून येतात. विशेष बाब म्हणजे इंटरनेटच्या मदतीने आपण साता समुद्रापार असलेल्या नातेवाईकला देखील मदत करू शकतो. हो.. तुम्हालाही हे नवल वाटतय ना? पण असं घडल आहे.
तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय.. गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास ६३ वर्षीय कैलाशचंद्र हे कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या त्यांचा मुलगा अंकितसोबत व्हिडीओ कॉलवर संवाद साधत होते. त्यावेळी अचानक एक ओळखीचा व्यक्ती त्यांच्याकडे आला. कैलाशचंद्र पारिक यांच्या सोबत त्या व्यक्तीने वाद घालण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला हा वाद शाब्दिक झाला, धक्कादायक बाब म्हणजे नंतर या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. हा वाद इतका टोकाला गेला की, त्यांच्यात वस्तु उचलत मारहाण झाली. हा प्रकार लाईव्ह कॅमेऱ्यात पाहणाऱ्या कैलाशचंद्र यांच्या मुलाने पाहिला. त्यानंतर त्याने तात्काळ इंदूर पोलिसांचा नंबर सर्च केला.
त्याने फोन करून वडिलांना मारहाण होत असल्याचं पोलिसांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र आरोपीने कैलाशचंद्र यांना मारहाण करून तिथून पळ काढला होता. ऐनवेळी सातासमुद्रापार असलेल्या मुलाने प्रसंगावधान राखत पोलिसांना कळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मुलाच्या तक्रारीवरून त्यांनी गुन्हा नोंदवत पुढील तपासाला सुरूवात केली आहे. पोलीस घटनास्थळी चौकशी करत असून आरोपी इसम आणि कैलाशचंद्र पारिक यांच्यात व्यावसायिक जुने वाद असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भयानक! हँडसम दिसण्यामुळे तरुणाचा गेला जीव, ८०० किलोमीटवरुन बाईकवरुन आला आरोपी अन् घेतला जीव
विश्वकप खेळायचा असेल तर IPL मध्ये करावी लागेल दमदार खेळी; भारताच्या स्टार प्लेयरची कारकिर्द धोक्यात
अभिनय आणि आईची जबाबदारी सांभाळता येईना, अनु्ष्का शर्माने घेतला मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली..
बापाने मुलासोबत मिळून केली जावई आणि त्याच्या भावाची हत्या, १० वर्षांपासून बघत होता या क्षणाची वाट