काल राष्ट्रवादीच्या युवा आमदारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरुन चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी, ‘घाबरण्याची गरज नाही आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही,’ असे युवा आमदारांना सांगितले. शरद पवार यांच्या या वक्तव्याला आता भाजपनं प्रतिउत्तर दिले आहे.
महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत शरद पवार यांच्यावर भाजपने टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आदरणीय शरद पवार साहेब… कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला 105 जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल.”
तसेच म्हटले की, “आदरणीय पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्यावर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. आधी 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!”
आदरणीय @PawarSpeaks साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा.
इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात.
55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 17, 2022
एवढेच नाही तर भाजपने शरद पवार यांच्यासाठी प्रश्न दिले आहेत. हे प्रश्न शरद पवार यांना सोडविण्यासाठी सांगितले आहे. त्यांनी ट्विट मध्ये लिहिले की, पावरजी, भाजपला राज्यात येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी हे प्रश्न सोडवून दाखवा.
आदरणीय @PawarSpeaks जी, कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही.
जनतेने भाजपला 105 जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत.जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल! pic.twitter.com/d8htKFkUhk
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 17, 2022
यामध्ये भाजपने शरद पवार यांना विचारलेली प्रश्न म्हणजे, राज्यात एसटी बंद, 6 महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभं उभं करपून जात आहेत. मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे , या सगळ्या प्रश्नांवर आधी उत्तर द्या ,असे भाजप म्हटले.
दरम्यान, युवा आमदार यांच्यासोबत शरद पवार यांची बैठक झाली होती. यावेळी, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. बैठक संपल्यावर सर्व आमदार जात असताना शरद पवार उठून उभे राहिले. त्यांनी दोन्ही हात उंचावले आणि आपल्या हाताची मुठ बंद करुन म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही.