सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांनी एंट्री मारली आहे. यामध्ये अनेक मोठमोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. सध्या अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. अशातच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो म्हणजे अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन देखील आहे.
त्याचबरोबर ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट होळीच्या निमित्ताने प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच १८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच चित्रपटाची धुमधाम तयारी सुरू आहे. अक्षय कुमार आणि त्याची टीम सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.
यासोबतच क्रिती सेनॉन आणि अरशद वारसी हे देखील या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. तसेच अजून हा चित्रपट प्रदर्शित झाला नसता तरी चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. समोर आलेल्या पहिल्या रिव्ह्यूनुसार, ‘बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन यांचा हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर रुपेरी पडद्यावर धमाका करणार आहे.’
तसेच ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट एक व्यापक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनॉन या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या दमदार ट्रेलरने अगोदरच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच चित्रपट प्रदर्शन होण्याच्या काही दिवस अगोदर, सुप्रसिद्ध चित्रपट पत्रकार आणि ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधूनीही सेन्सॉर स्क्रीनिंग दरम्यान हा चित्रपट पाहिला होता.
त्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू शेअर केला. या चित्रपटाचे पहिले रिव्ह्यू शेअर करताना उमेर संधूने लिहिले की, “‘बच्चन पांडे’ चे सेन्सॉर स्क्रीनिंग संपले आहे. कॉमेडी, डेडली स्टंट्स आणि रोमान्स, एक पूर्णपणे पॉवर पॅक्ड मास एंटरटेनर आहे. या चित्रपटातून अक्षय कुमारने दहशत निर्माण केली आहे. तसेच हा चित्रपट नक्कीच हिट आहे.”
तसेच या चित्रपटाचा दिग्दर्शक फरहान सामजी हे आहेत. त्यांनी ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यासोबत अक्षय कुमार आणि फरहान सामजी चौथ्यांदा या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. यापूर्वी अक्षय कुमार आणि फरहान सामजी यांनी ‘एंटरटेनमेंट’, ‘हाउसफुल ३’ आणि ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. अशामध्ये ही जोडी यावेळी रुपेरी पडद्यावर काय जादू करेल ही पाहण्यासारखे आहे.