मुंबई | बॉलीवूडमध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडत असतात. बॉलीवूडमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती यशस्वी होईल असे नाही. बॉलीवूडबद्दल असे बोलले जाते कि बॉलीवूडमध्ये आपली जागा निर्माण करायची असेल तर कोणत्या न कोणत्या गॉड फादरचा हात डोक्यावर असावा लागतो. त्याशिवाय त्यांच्या करियरला ब्रेक मिळत नाही.
हे जरी खरे असले तरी बॉलीवूडमध्ये अशी अनेक नावे आहेत ज्यांनी कुणाचा सहारा न घेता स्वताच्या हिम्मतीवर आणि टॅलेंटच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वताची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. कंगना राणावत, प्रियांका चोपडा, राजकुमार राव, आयुष्मान खुराना, विद्या बालन यांसारखे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कुणाचा सहारा न घेता आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मात्र या कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबतचे अनेक किस्से कलाकार चाहत्यांशी बोलतांना सांगत असतात. असाच एक मन हेलावून टाकणारा किस्सा विद्या बालनने देखील सांगितला. येत्या १८ मार्च रोजी विद्या बालनचा ‘जलसा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विद्या मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात विद्यासोबत मानव कौल, शेफाली शाह, रोहिणी आणि इक्बाल खान देखील महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत.
विद्याचा ‘जलसा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. या प्रमोशन दरम्यानच विद्या बालनने एका वृत्तपत्राशी बोलतांना तिच्या जीवनातील धक्कादायक खुलासे केले. विद्याने सांगितले, मला आतापर्यंत तब्बल १३ चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.
सुरुवातीला म्हणजे २००३-४ च्या सुमारास मला के. भालचंद्र यांच्या दोन चित्रपटासाठी विचारण्यात आले होते. त्यावेळी लगेच मी त्यांना या चित्रपटासाठी होकार दिला. मात्र त्याचवेळी मला बाकीच्या अनेक चित्रपटातून रिप्लेस करण्यात आले होते. त्यानंतर के.भालचंद्र यांनी देखील त्यांच्या दोन्ही चित्रपटातून मला काढून टाकले. त्यावेळी मला कोणतीही कल्पना न देता त्यांनी हा निर्णय घेतला.
के. भालचंद्र यांच्या या निर्णयामागचे कारण मला अजूनही समजले नाही. मात्र त्यावेळी मला या निर्णयाचा खूप त्रास झाला. मी खूप रडले, काय करावे काही सुचत नव्हते अशा परिस्थिती मी रडत-रडत भर उन्हात मरीन ड्राइव्हवरून वांद्र्यापर्यंत पायी चालत गेले. तो दिवस अजूनही आठवला कि माझ्या डोळ्यात अश्रू येतात.
विद्या एवढ्यावरच थांबली नाही तर तिने त्या दिग्दर्शकाच्या वागणुकीचा धक्कादायक खुलासा देखील केला. विद्या म्हणाली, सुरुवातीच्या काळात माझ्याबरोबर खूप लोकांनी वाईट व्यवहार केला. एकदा असच एका दिग्दर्शकाने मला चित्रपटातून हाकलून दिले. एवढेच नाही तर तो माझ्याशी खूप पद्धतीने वागला. त्याच्या या वागणुकीमुळे मी अगदी डिप्रेशनमध्ये गेले होते.
त्या दिग्दर्शकाच्या अशा वाईट वागणुकीमुळे मी त्यानंतरचे सहा महिने मी इतकी डिप्रेस झाले होते, कि त्यानुळे मी स्वला आरशात पाहण्याची हिम्मत करू शकले नाही. या घटनेतून बाहेर पडण्यास मला खूप वेळ लागल. पण त्यानंतर मी त्या घटनेतून बाहेर पडले, आणि स्वताला सिद्ध केल. ज्यांनी ज्यांनी मला चित्रपटातून बाहेर काढले होते आता त्या दिग्दर्शकांचे फोन आल्यास मी त्यांना अगदी पद्धतशीरपणे नकार देते.
विद्या बालन हि नामांकित अभिनेत्रींनपैकी एक आहे. आज विद्या बालनच्या फक्त नावावर अनेक चित्रपट हिट होतात. विद्या बालनने तिच्या करीयरची सुरुवात बंगाली चित्रपटातून केली होती. २००३ साली तिचा बंगाली चित्रपट “भालो ठेकों” प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
त्यानंतर तिने ‘हम पांच’ या हिंदी कॉमेडी मालिकेतून तिने हिंदी सिनेमासृष्टीत दमदार एन्ट्री केली. तिची हि मालिका भयानक गाजली होती. त्यानंतर तिने संजय दत्तसोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’, मिथुन चक्रवर्तीसोबत ‘गुरु’ आणि अक्षय कुमारसोबत ‘हे बेबी’ यांसारख्या चित्रपटात काम केले.
महत्वाच्या बातम्या:
‘मला तब्बल १३ चित्रपटातून काढून टाकले’, विद्या बालनने सांगितला मन हेलावून टाकणारा किस्सा
‘तुम्हाला १६ कोटींचा खेळाडू झेपणार नाही’, बढाई मारणाऱ्या PCL ला माजी क्रिकेटपटूने दाखवली जागा
‘मी पूर्णपणे कर्जबाजारी झालो, माझ्यावर ३-४ खटले दाखल आहेत’; ‘लॉकअप’मध्ये अभिनेत्याने व्यक्त केलं दु:ख
शाहीदसोबतची ती रात्र खूपच त्रासदायक गेली; कंगणाने दिलेल्या जाहीर कबुलीने उडाली खळबळ