कष्ट आणि मेहनतीशिवाय फळ मिळत नाही. हे जरी खरं असलं तरी देखील अनेकांना कमी वेळात शॉर्टकट मार्ग निवडणूक पैसे मिळवण्याचा नाद असतो. या साठी ते अनेकांचे सल्ले घेतात, धक्कादायक बाब म्हणजे अंधश्रद्धा बाळगून टोकाचे पाऊल देखील उचलतात. अशा अनेक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी एका दाम्पत्याने आपल्याच पुतण्याचा जीव घेतला आहे. सध्या या प्रकरणी दाम्पत्याला अटक करण्यात आली असून चौकशी दरम्यान झालेल्या खुलाश्याने पोलिस देखील चक्रावले.
तर वाचा नक्की प्रकरण काय..? ही घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) चित्रकूटमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. भुल्लू आणि त्याची पत्नी उर्मिला यांनी दिवाळीला एक स्वप्न आलं होतं. यात त्यांच्या घरात तीन हंडा धन पुरल्याचं दिसलं. जर त्या ठिकाणी पूजा केली आणि कोणा अल्पवयीन मुलाचा बळी दिला तर त्यांना धन मिळेल.
त्यानंतर त्यांनी या स्वप्नाला खरं मानून श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी दाम्पत्याने तंत्र-मंत्राची मदत घेतली. तसेच जास्त पैशांसाठी आरोपींनी आधी मुलाचा गळा दाबला आणि त्याच्या डोक्यावर दगडाने मारून हत्या केली. आणि धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह त्यांनी धान्याच्या डब्यात भरून ठेवला.
शेजारीच राहणाऱ्या राम प्रयाग रैदान नावाच्या व्यक्तीने गेल्या महिन्यात आपला 9 वर्षीय मुलगा कन्हैया बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिस या बेपत्ता मुलाचा शोध घेऊ लागले. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी बेपत्ता मुलाच्या शेजारील काका-काकींच्या घरातून दुर्गंधी पसरल्याने या घटनेचा तपास लागला.
दरम्यान, पोलिसांना काका-काकीला अटक केले. त्यानंतर चौकशीदरम्यान त्यांनी सांगितलेली कहाणी ऐकून पोलिसांना देखील जबर धक्का बसला. सध्या या प्रकरणी या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात देखील एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आघाडीत बिघाडी! …तर मी तुमची हाडे मोडेन; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला थेट इशारा
जेव्हा स्वत:च्याच लग्नात मंगळसूत्र घरी विसरला होता ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, स्वत:च सांगितला फजितीचा किस्सा
जेव्हा तोंडावरील जखमा लपवण्यासाठी चष्मा घालून अवॉर्ड नाईटला पोहोचली होती ऐश्वर्या, सलमानसोबत झाले होते भांडण?
सोनू सूदची बहीण मालविका यांना पराभवाचा धक्का; भाऊ म्हणाला, ‘फोन नंबर याद है ना दोस्तों…?’