सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे ठाकरे सरकारमधील नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय निलेश राणेंनी व्यक्त केला. राणे यांच्या या विधानानंतर राणे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राणे पिता – पुत्रांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तर दुसरीकडे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
सध्या या व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांना दाऊदचा हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधन वापरणार्या नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हा दाखल करण्यासाठी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी फिर्याद दिली आहे.
त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापले असून राणे बंधूंच्या अडचणींमद्धे वाढ होणार असल्याचे चित्र गडद झाले आहे. तसेच आव्हाड यांनी मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत पंतप्रधान मोदी मुंबईत घडलेल्या घटनांचा गुजरातमध्ये लगेच कसा परिणाम होतो, यावर बोलताना दिसून येत आहेत.
अंडरवर्ल्ड अन शरद पवारांबद्दल पंतप्रधान मोदीजी हे काय बोलत आहेत ?
ज्यांना समजेल त्यांनी वाचावे बाकीच्यांनी बक बक चालू ठेवावी pic.twitter.com/bOpBATgiTT— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 13, 2022
पुढे भाषणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उल्लेख करताना मोदी म्हणतात, “एकेकाळी अंडरवर्ल्डमुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुंबई अंडरवर्ल्डच्या ताब्यात गेली तर काय होईल? याची चिंता सर्वांना होती. मी म्हणतो, शरदरावांमध्ये हिंमत आणि कौशल्य होतं. त्यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं. मुंबईला बाहेर काढलं.”
दरम्यान, मुंबईला अंडरवर्ल्डच्या तावडीतून वाचविण्यात शरद पवारांच मोठं योगदान आणि कौशल्य असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. याचबरोबर या व्हीडिओमध्ये प्रेक्षकात शिवसेना खासदार अरविंद सावंतही कार्यक्रमाला उपस्थित दिसून येत आहेत. सध्या राजकीय वर्तुळात हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
..त्यावेळी माझ्या आणि विवेकच्या विरोधात फतवा जारी केला होता, पल्लवी जोशींचा मोठा खुलासा
सत्तेत येण्यापु्र्वीच भगवंत मान यांचा मोठा निर्णय, माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा घेतली काढून
अविस्मरणीय! पुरूषही तोंडात बोटं घालतील अशी फिल्डिंग केली ‘या’ महिला क्रिकेटपटूंनी, पहा व्हिडीओ
तेव्हा जावेद अख्तर श्रेयाला म्हणाले, उपरवालेने आपको बनाना शुरू किया, पहले विद्या बालन से शुरू किया..