राज्याच्या राजकारणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. अनेकदा त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच काही दिवसांपासून पटोले हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले आहेत. पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाने ते चांगलेच चर्चेत आले होते.
त्यानंतर त्यांच्यावर टिकेचा भडीमार झाला होता. भाजपने आक्रमक पवित्रा घेत पटोले यांच्या विरोधात आंदोलने देखील केली होती. मात्र आता पटोले हे दुसऱ्या एकदा कारणाने चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणात त्यांच्यावर टीका नाही तर, सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय.. पटोलेंनी मुंबईला ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या लहान मुलीसाठी स्वतःचे हेलिकॉप्टर दिले आहे. सोलापुरातील उंजल तुकाराम दासी या 4 वर्षीय मुलीला हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईला जायचे होते. पटोले हेलिकॉप्टरने सोलापूरला आले होते मात्र त्यांनी स्वतःचे हेलिकॉप्टर संबंधित मुलीच्या कुटुंबाला मुंबईला जाण्यासाठी दिले.
तसेच नाना पटोले हेलिकॉप्टर ऐवजी रेल्वेने मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. याबाबत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पटोले यांना मी सदर मुलीची कैफियत मांडल्यावर त्यांनी त्यांचं हेलिकॉप्टर त्या मुलीला मुंबईला जाण्यासाठी दिलं.
आता पटोले हे सिद्धेश्वर एक्स्प्रेसनं मुंबईला जातील. ती मुलगी बरी होऊन सोलापूरमध्ये परत येऊदेत आणि नानाभाऊंना आशीर्वाद मिळू देत, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. दरम्यान, पटोले यांचा दिलदारपणा पाहून त्यांच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होतं आहे. ‘नेता असावा तर असा,’ असं अनेक नागरिक म्हणत आहेत.
उंजल तुकाराम दासी (वय ४) असे या मुलीचे नाव आहे. या मुलीला हृदयविकाराचा त्रास होता. या चिमुकलीवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. उपचाराकरीता मुंबई येथे जाण्याची आवश्यकता होती. तिचे वडील तुकाराम दासी (रा. सुनील नगर, एमआयडीसी, सोलापूर) यांच्यासह कुटुंबातील व्यक्तींनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे याबाबतची विनंती केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
आमच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा आमदाराने पैशांचा घोटाळा केला तर.., अरविंद केजरीवाल यांचा इशारा
‘‘महाराष्ट्राच्या जनतेने गेल्या ५५ वर्षांत मला एका दिवसासाठीही रजेवर पाठवलेले नाही यासाठी मी त्यांचा ऋणी’’
बहिण मालविकाच्या पराभवानंतर सोनू सूदचं पहिलं ट्विट वाऱ्यागत व्हायरल; बड्या – बड्या नेत्यांच्या भुवया उंचवल्या
सेटवर १५ वर्षीय रेखासोबत घडला होता ‘हा’ भयानक प्रकार, ढसाढसा रडली होती रेखा, कर्मचारी वाजवत होते शिट्ट्या






