Share

‘द कश्मीर फाईल्स’चे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक; दिग्दर्शक आभार मानत म्हणाले…

the kashmir files

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर अभिनित ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून सगळीकडून चित्रपटाला चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हा चित्रपट आवडला आहे. त्यांनी चित्रपटाच्या टीमची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले आहे.

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे टीमचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी लिहिले की, ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे हा एक सुखद अनुभव राहिला. द कश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल त्यांच्यांकडून मिळालेले कौतुकाचे शब्द यास अजून खास बनवत आहेत. आम्हाला यापूर्वी कोणत्या चित्रपट निर्मितीबद्दल इतका अभिमान वाटला नाही. धन्यवाद मोदी जी’.

विवेक अग्निहोत्री यांनी अभिषेक अग्रवाल यांचा ट्विट रिट्विट करत लिहिले की, ‘मी खूप खुश आहे की, अभिषेकने भारतातील एक आव्हानात्मक सत्य दाखवण्याची हिम्मत दाखवली. युएसएमधील द कश्मीर फाईल्सच्या स्क्रिनिंगने हे दाखवून दिले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाचा दृष्टिकोण बदलत आहे’.

दरम्यान, ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९८९-९० च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णीसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.

परंतु, ११ मार्च रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि प्रदर्शनानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३.५५ कोटींचा बिझनेस करत चांगली सुरुवात केली होती. तसेच आताही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पुढील काळातही चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
जातीयवादी म्हणत ट्रोल करणाऱ्यांना नागराजने दिलं सर्वांची मनं जिंकणारं उत्तर; वाचून तुम्हीही कौतूक कराल
“द काश्मिर फाईल्स’ पाहून ढसाढसा रडली महिला, थेट पकडले दिग्दर्शकाचे पाय; म्हणाली…
‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी विवेक अग्निहोत्रींकडे मागितले ‘एवढे’ रूपये, प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा

बाॅलीवुड ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now