रशियाला तोंड देता देता नाकीनऊ आले असतानाच युक्रेनवर आणखी एक देश करणार हल्ला; अख्ख जग टेंशनमध्ये

युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेण्यासाठी रशिया पूर्ण प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप रशियाच्या हाती यश लागलेले नाही. अशातच रशियाचा मित्र देश बेलारुस शनिवारी रात्री युक्रेनवर हल्ला करणार असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीने हा दावा केला आहे.

त्यांनी सांगितले आहे की, बेलारुसचे सैन्य रात्री युक्रेनवर हल्ला करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यापुर्वी रशियाने बेलारुसमधून युक्रेनवर हल्ले केले होते. त्यावेळी युक्रेनने देखील आपल्या देशाला वाचविण्यासाठी बेलारुसवर हल्ला केला होता. त्यानंतर आता रशिया बेलारुसला ही या युध्दात उतरवण्यासाठी उचकवत असल्याचा आरोप युक्रेन करत आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून युध्द सुरु आहे. रशियन सैन्यांनी आता ओडेसामध्ये हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. रशियन सैन्य ओडेसामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु युक्रेन सैन्यांनी तेथील सर्व मार्ग बंद करुन टाकले आहेत.

नुकताच लुत्स्कच्या महापौरांच्यावतीने दावा करण्यात आला आहे की, रशियन सैन्यांनी केलेल्या गोळीबारात 4 जवान शहिद झाले आहेत. तसेच 6 सैन्यांना गंभीर दुखापत झाली आहे. रशियाने किववर जे बॉम्ब हल्ले केले आहेत. त्यात नागरिकांना ही गंभीर दुखापत झाली आहे.

मुख्य म्हणजे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेनस्की यांनी रशियावर गंभीर आरोप केले आहेत. रशियाने मेल्टिपूल शहराच्या महापौरांचे अपहरण केल्याचे युक्रेनने म्हटले आहे. याबाबतची माहिती युक्रेन संसदेने दिली आहे. रशियाने महापौरांचे अपहरण केल्यामुळे युक्रेनने रशियन सैनिकांचा निषेध नोंदविला आहे.

दरम्यान वोलोडिमिर झेलेनस्की यांनी रशियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. झेलेनस्की यांनी म्हटले आहे की, हा लोकशाहीविरोधातला गुन्हा आहे. रशियाची ही कृती इस्लामिक देशांमधल्या अतिरेक्यांसारखी आहे. याचे सडेतोड उत्तर युक्रेन लवकरच देईल असा इशारा झेलेनस्की यांनी रशियाला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या
२४ वर्षीय पायलट महाश्वेताची कौतूकास्पद कामगिरी, युक्रेनमधून ८०० भारतीय विद्यार्थ्यांना आणले भारतात
मुलगा मुख्यमंत्र्यांना पाडून झाला आमदार, तरीही सफाई कामगार आई पोहोचली कामावर; म्हणाली..
आतंकवाद्यांना पाकच पुरवतो पैसा, त्यांना काळ्या यादीत टाका; अमेरिकन खासदाराने केली पोलखोल
जातीयवादी म्हणत ट्रोल करणाऱ्यांना नागराजने दिलं सर्वांची मनं जिंकणारं उत्तर; वाचून तुम्हीही कौतूक कराल