Share

जातीयवादी म्हणत ट्रोल करणाऱ्यांना नागराजने दिलं सर्वांची मनं जिंकणारं उत्तर; वाचून तुम्हीही कौतूक कराल

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या प्रत्येक चित्रपटातून त्यांचा एक व्यक्ती म्हणून विशेष ठसा उमटला आहे. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांनंतर त्यांनी ‘झुंड’ च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटावरून सोशल मीडियावर दोन गट पडले. एका गटाने नागराज यांच्या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. तर दुसऱ्या गटाने चित्रपटाला सोडून दुसऱ्या विषयांवरून त्यावर विनाकारण टीका करण्यास सुरुवात केली.

एका गटाने टीका करत म्हटले की, इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? असा प्रश्न झुंड चित्रपटावरून नागराज मंजुळे यांना केला. सोशल मीडियावर नागराज यांना काही लोकांनी हा मुद्दा घेऊन प्रचंड ट्रोल केले. यावर आता नागराज यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

‘झुंड’च्या टीमने चित्रपटाच्या यशानंतर एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी नागराज यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. म्हणाले, मी कोणत्याही जातीला मानत नाही, त्यामुळे तुम्हीही मला कोणत्या जातीच्या बेडीत अडकवू नका.

तसेच म्हणाले, माझ्या जवळ सगळ्या जातींची माणसं आहेत. मी स्वत:ला कोणत्याच जातीचा मानत नाही. त्यामुळे मला कोणी कोणत्या जातीचा मानू नये. सोशल मीडियावरच्या कमेंट्स मी वाचत नाही. माझ्या घरात सगळ्या जातीचे लोक राहतात. मी जातीयवादी आहे, असं मला कोणी म्हटलं तरी मी ते गांभीर्याने घेणार नाही.

नागराज मंजुळे यांना एका गटाकडून सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की, मी कुठे चुकतोय हे माझ्यावर टीका करणाऱ्यांनी समोर येऊन सांगावे. फेसबुक सारख्या सोशल मीडियावर नको. फेसबुक हे गंभीर माध्यम नाही.

काही लोक घरी बसल्या बसल्या या सोशल मीडियाचा आधार घेत काहीही लिहितात. मी कोणाच्या विरोधात नाही. मी जातीच्या विरोधात आहे. मी माझ्यादेखील जातीच्या विरोधात आहे. जो जात-धर्म पाळतो त्या व्यक्तीच्या मी विरोधात आहे. जगातल्या उन्नत विचारसरणीच्या विरोधात आपण जे वागतो ते चुकीचे आहे. असे ते यावेळी म्हणाले.

इतर

Join WhatsApp

Join Now