सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.
तर आता शिवसेना नेते आणि त्यांचे निकटवर्तीय केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. केंद्रातील सरकार पदाचा दुरुपयोग करून त्रास देत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यातील संघर्ष येणाऱ्या काळात अधिक वाढणार असल्याचे चित्र आहे.
अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज नेत्यांची यादी जाहीर करून सर्वांवर कारवाई होणारच असे म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोमय्या ठाकरे सरकारवर आरोपांची टीकास्त्र डागत आहेत. अशातच आता सोमय्यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे.
सध्या या ट्वीटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. सोमय्या यांनी ट्विट करत आता अनिल परबांचा नंबर लागणार असल्याचे त्यात म्हटले आहे. सोमय्या ट्वीटमध्ये म्हणालेत की, “आत्ता अनिल परबचाही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा… चौकशी होणार.’
https://twitter.com/KiritSomaiya/status/1502477066100359168?s=20&t=8B7bG7iplpFPUs1v1HGznA
भारत सरकारनं दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे. 30 मार्च रोजी सुनावणी होणार” या आशयासह सोमय्यांनी रिसॉर्टचे दोन फोटोही शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचं रिसॉर्ट आणि बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारवर नवनवी आरोप करत आहेत. तसेच, उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार असल्याचं वक्तव्यही काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी केलं होतं. आता अनिल परब यांना लक्ष केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘आपचा ताप आम्हाला नाही’, गोपीनाथ मुंडेंची भविष्यवाणी ठरली खरी, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
PHOTO: अमिताभ बच्चन यांची नात आहे खुपच सुंदर, अभिनय सोडून करत आहे ‘हे’ काम, स्वत:च सांगितले कारण
‘लोकं खुप पाखंडी आहेत’, ब्लॅक गाऊनवरच्या ‘त्या’ फोटोने ट्रोल झाल्यानंतर मलायका अरोरा भडकली
मलिक हे पवारांचे खास, ‘मला असा संशय येतो की पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे’