‘पुणे तिथे काय उणे’, असं आपण नेहमी म्हणतो. अगदी खरच ते.. पुण्यात काय नाही असे काहीच नाही. मी ती पुण्यातील भाषा असो किंवा पुणेकरांचा तो पुणेरी बाणा असो. पुणे हे शहर विद्येचे माहेर घरं म्हणून देखील ओळखलं जातं. अनेकदा आपण पुणेकरांचे वेगवेगळे किस्से वाचत असतो.
तर पुणेकरांच्या पाट्यांबद्द्लही तुम्हाला वेगळं सांगायला नको. पुणेकर कोणतंही उत्तर कधीच सरळ देत नाहीत, ही पुणेकरांची खास ओळख. तसेच पुणेकरांच्या शुद्ध बोलण्यावरूनही आपण नेहमी कौतुक करत असतो. असाच एक पुणेरी आजोबांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
खूप मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर पुणेकरांच मेट्रोणे प्रवास करण्याच स्वप्न पूर्ण होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता. ६) वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आहे. हा टप्पा गाठण्यासाठी जवळपास १६ वर्ष कालावधी लोटला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १२ किलोमीटर लांबीची मेट्रो प्रवासी सेवा सहा मार्चपासून सुरू झाली आहे. प्रवासी सेवेला प्रारंभ झाल्यापासून प्रवाशांचा मेट्रोला मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक लाख प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. तसेच मेट्रोच्या आगमनाने पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडत आहे.
सध्या पुणेकर आजोबांचा मेट्रोमधील व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. एका पत्रकारानं पुणेकर आजोबांना मेट्रो प्रवासाबद्द्ल विचारलं. यावेळी त्या आजोबांनी पत्रकाराला उत्तर काही उत्तर दिलं. की आजोबांचा व्हिडीओ अवघ्या काही मिनिटात संपूर्ण राज्यात व्हायरल झाला आहे.
तर वाचा नेमकं काय घडलं… आजोबा मेट्रोचा पहिला प्रवास करण्यासाठी मेट्रोत बसले. यावेळी पत्रकारानं लगेच त्यांना प्रतिक्रिया विचारली. पत्रकाराच्या या प्रश्नावर आजोबा उत्तर देतांना म्हटलंय की, ‘उत्तच बसलो आणि नंतर या.’ एकानं इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, ‘पुणेकर जोरात आणि बाकी सगळे कोमात’, असे म्हंटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘भाजपाच्या विजयात ओवैसी, मायावतींचं योगदान; त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा लागेल’
पतीला दोन वर्षे दिली लिंग बदलण्याची औषधं, बनवलं सुंदर मुलगी; मुलाला ‘या’ अवस्थेत पाहून वडिल बेशुद्ध
भाजपच्या विजयानंतर ओवेसींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘हा’ पक्ष संपला तर लोकशाहीसाठी दु:खद दिवस असेल
पराभवानंतर अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया; ‘भाजपला उतरती कळा लागली…’