Share

पत्नीला वाचवण्यासाठी डाॅक्टरची तडफड; गहाण ठेवली MBBS ची डिग्री गहाण; कहाणी वाचून येईल डोळ्यात पाणी

ही हृदयद्रावक कहाणी ऐकल्यानंतर प्रत्येक पत्नीला वाटेल की ‘नवरा असावा तर असा’. या एका जोडप्याच्या प्रेमाची ही कहाणी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पतीने आपल्या आजारी पत्नीच्या उपचारासाठी स्वतःची एमबीबीएसची पदवी गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले आहे.

ही घटना आहे राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील खैरवा गावातील सुरेश चौधरीची. आजारामुळे मृत्यूला कवटाळत असताना पत्नीला तिच्या डॉक्टर पतीने वाचवलं आहे. पत्नीची काळजी घेण्यासाठी सव्वा कोटी रूपये खर्च केले आणि आपल्या प्रेमाला वाचवलं आहे.

सुरेशने तिच्या पत्नीच्या उपचारासाठी आपलं सर्व पणाला लावलं आहे. तिच्या उपचारासाठी त्यानं आपली एमबीबीएसची डिग्री कर्जाऊ ठेवून बँकेकडून 70 लाखांचं लोन घेतलं आहे. त्याच्याजवळ केवळ 10 लाखांची सेव्हिंग होती. त्यानं पत्नीच्या उपचारासाठी 15 लाखात आपला एक प्लॉट विकला.

सुरेशच्या पत्नीचे नाव अनिता असून, गेल्या वर्षी मे महिन्यात तिला ताप आला होता. तपासादरम्यान अनिता कोरोना पॉझिटिव्ह आली. काही वेळानंतर तिची प्रकृती बिघडली. सुरेश तिच्या उपचारासाठी बांगड रुग्णालयात पोहोचला. मात्र तिथे त्यांना बेड मिळाला नाही. त्यानंतर त्याने पत्नीला जोधपूर एम्सला नेले. सुरेश आणि अनिता यांना पाच वर्षांचा मुलगा देखील आहे.

दरम्यान, कोरोनाची रुग्ण संख्या प्रचंड वाढत होती. त्यातच सुरेशला सुट्ट्याही मिळत नव्हत्या. यासाठी ते आपल्या एका नातेवाईकाला पत्नीजवळ सोडून कामाला गेला होता. मात्र, 30 मे रोजी तिची प्रकृती अधिक बिघडली. तिच्या फुप्फुसात 95 टक्के संसर्ग झाला होता, आणि ती छोट्या व्हेंटिलेटरवर होती.

अनिताची स्थिती पाहून, डॉक्टरांनी तर अशाच सोडली होती. या परिस्थितीत सुरेशने हार मानली नाही. तो पत्नीला घेऊन अहमदाबादला गेला, तेथील रुग्णालयात तिला भरती केले. या सगळ्या गोष्टीत अनिताचे वजन 50 किलोहून 30 किलोपर्यंत गेलं होतं. तिच्या शरीरात रक्ताची कमतरता झाली.

डॉक्टरांनी तिला आसीएमओ मशीनवर ठेवलं. डॉक्टरांनुसार, याच्या माध्यमातून हार्ट आणि फुप्फुसं बाहेरून ऑपरेट करता येते. ही प्रक्रिया खूप महागडी असते. यासाठी दिवसातला साधारण 1 लाख रुपये खर्च होता. त्याने पत्नीला वाचवण्यासाठी हा उपचार घेण्याचे ठरवले. दरम्यान, अनिता 87 दिवस या मशीनवर होती. त्याने अखेर त्याचे सर्व प्रयत्न करून तिला वाचवले.

इतर

Join WhatsApp

Join Now