उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. पहिल्या चार तासातचं चित्र जवळपास स्पष्ट झालं होतं. भाजपने ४०३ पैकी २५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली. त्यामुळे योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनणार असल्याचे दिसून येत आहे. (buldozer baba yogi adityanath)
त्यामुळे आता राज्यातून माफिया आणि गुंडराज यांना संपवण्याचे श्रेय देण्यासाठी बुलडोझर बाबा असे लिहिलेले त्यांचे मोठमोठे पोस्टर्स आणि होर्डिंग्जही निवडणूक प्रचारादरम्यान लागलेले दिसून येत आहे. विशेष म्हणजे मोठमोठ्या जेसीबीवरही हे होर्डिंग्ज लावण्यात आले होते आणि ते राज्यभर दिसत होते.
१० मार्च रोजी यूपीच्या जिल्हा मुख्यालयात विजयाच्या घोषणा आणि तसेच जय श्री राम ते बाबा बुलडोझर योगी आदित्यना अशा घोषणाही ऐकायला मिळतील तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बाबा बुलडोजर हे नाव समाजवादी समाजवादी पक्षानेच दिलेला आहे आणि त्याचा फायदा भाजपने घेतला आहे, ज्याचे नुकसानही सपालाच भोगावे लागणार आहे.
समाजवादी पक्षाने बाबा बुलडोझरचा उल्लेख विनोद म्हणून केला होता, असे सांगितले जाते. गेल्या महिन्यात अयोध्येत एका सभेला संबोधित करताना सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले होते की, आतापर्यंत आम्ही त्यांना ‘बाबा मुख्यमंत्री’ म्हणत होतो. पण आज एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्राने त्यांना ‘बाबा बुलडोझर’ म्हटले. त्यानंतर लगेचच भाजपने मुख्यमंत्र्यांच्या सभांना बुलडोझर आणण्यास सुरुवात केली. तिथूनच त्यांचे नाव बाबा बुलडोझर असे पडले.
दरम्यान, मार्च २०१७, जेव्हा आदित्यनाथ सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून ५ डिसेंबरपर्यंत यूपी पोलिसांनी १२ हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक केल्याचा दावा केला. तसेच पोलिसांनी यूपी अंतर्गत गुन्हेगारांवर १४,९८२ गुन्हे दाखल केल्याचा दावाही केला आहे.
गुंड आणि समाजविरोधी क्रियाकलाप कायद्यांतर्गत, पोलिसांनी १९०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचा आणि बेकायदेशीरपणे बनवलेल्या मालमत्ता पाडल्याचा दावा केला आहे. पाडण्यात आलेल्या प्रमुख इमारतींमध्ये बसपचे माजी खासदार दाऊद अहमद, फरार गुन्हेगार बदनसिंग बडू आणि गुंड विकास दुबे याशिवाय गुंडातून राजकारणी झालेले मुख्तार अन्सारी आणि अतिक अहमद यांच्या मालमत्तांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
पंजाबच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे नाही तर फक्त ‘या’ व्यक्तींचे फोटो लागणार, विजयानंतर ‘आप’चा मोठा निर्णय
‘भाजपा’ने नोटा वापरल्याने आम्हाला ‘नोटा’पेक्षा कमी मतं : संजय राऊत
उत्तरप्रदेश निवडणूकीत ईव्हीएम घोटाळा झाला का? निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ उत्तर