सध्याच्या काळात सोशल मीडियावर प्रँक व्हिडिओंचा (Prank Videos) महापूर आला आहे. लोक अशा खोड्या करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे व्हिडीओ अनेकदा पाहिले जातात पण विनोदाच्या नावाखाली बनवलेले हे व्हिडीओ काही वेळा धोकादायक ठरतात. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये प्रँकचा निकाल खूपच वाईट असल्याचे सिद्ध झाले आहे.(Terrible prank with guards at the morgue)
असाच एक प्रँक व्हिडिओ (Prank Videos) सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शवागारात बनवण्यात आला आहे. यामध्ये रात्री ड्युटी करणाऱ्या गार्डला हृदयविकाराचा झटका येता येता राहिला. जिवंत माणसाला कोणी घाबरत नाही, पण तुम्ही शवागारात गेलात, आणि प्रेत अचानक जागे होऊन तिथे बसले तर तुमचे काय होईल? विचाराने थरथर कापला ना?
असाच काहीसा प्रकार घडला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. खरंतर हा सर्व पराक्रम एका प्रँक व्हिडिओचा आहे. आता विनोदाच्या नावाखाली लोकं कोणत्याही प्रकारचा प्रँक करायला मागे-पुढे पाहत नाहीत. ईस्ट लंडनमधील टी क्रिब अँड सन्स नावाच्या शवागारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तेथील सुरक्षारक्षकांसोबत हा धोकादायक प्रँक केला आहे.
त्या दिवशी कर्मचारी स्वत: प्लॅस्टिकने झाकलेल्या उर्वरित मृतदेहांसह बाकावर झोपला होता. तेथे सुरक्षाकर्मचारी आल्यावर तेथील स्टाफने थोडी गंमत केली. आधी रक्षकाला वाटले की हा सगळा भ्रम आहे. मात्र काही वेळाने मृतदेहामध्ये सतत हालचाल होत असल्याचे पाहून सुरक्षाकर्मचारी मृतदेहाजवळ तपासणीसाठी गेला. अचानक प्रेत उठून बसले. हे पाहिल्यानंतर गार्डची प्रकृती बिघडली. तो घाबरून ओरडू लागला.
ही संपूर्ण घटना तेथील एका गुप्त कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये स्ट्रेचरवर दोन बेवारस मृतदेह दिसत आहेत. त्यातील एकाच्या आत कर्मचारी लपले होते. आपली चेष्टा केली जात आहे हे गार्डलाही कळले नाही. प्रेत उठून खाली बसले, तेव्हा काही काळ गार्डला हृदयविकाराचा झटका आल्यासारखे वाटले. मात्र, कर्मचाऱ्यांची ओळख पटल्यानंतर त्यांना संपूर्ण प्रकरण समजले. व्हिडिओमध्ये तो कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करताना ऐकू येत आहे.
काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. तथापि, नंतर बातमी आली की टी क्रिब अँड सन्सने या व्हिडिओमध्ये विनोद करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. एवढेच नाही तर या प्रँकमध्ये सहभागी असलेल्या सर्व लोकांना निलंबितही करण्यात आले आहे. या शवागाराचे वरिष्ठ भागीदार जॉन हॅरिस म्हणाले की, हे अत्यंत लज्जास्पद आहे. शवागाराच्या आत असा विनोद असह्य आहे. त्यामुळे या प्रँकमध्ये सामील असलेल्या सर्वांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या घटनेतून उर्वरित कर्मचारी बोध घेतील व भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या-
तेव्हा लहाणपणी लग्न व्हायची तुमचं अजून झालं नाही, राज ठाकरेंचा कोश्यारींना टोला
राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटला; आघाडी विरोधात कोर्टात जाणाऱ्या भाजपलाच कोर्टाने झापले
PHOTOS: या आहेत भोजपुरीच्या टॉप १० ग्लॅमरस अभिनेत्री; सनी लिओनी, नोरा फतेहीही पडतील फिक्या
सोनाक्षी नाही, तर ‘या’ अभिनेत्रीशी ठरलं होतं सलमानचं लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या; पण पुढे