सार्वजनिक कार्यक्रम असेल तर, अनेक ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक आमदार, खासदार, दिग्गज व्यक्ती, सेलिब्रिटी यांना बोलावलं जातं. अशा वेळी त्यांची कार्यक्रमातील उपस्थिती लक्ष वेधून घेत असते. नुकतेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते यांच्या पत्नीने एका कार्यक्रमात गाण्यावर डान्स केल्याने सध्या त्याची चर्चा होत आहे.
8 मार्च ला जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने पुणे जिल्ह्यात इंदापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्ह्णून राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नीला बोलवण्यात आलं होतं.
यावेळी ‘परदेसिया, ये सच है पिया, सब कहते है तुने मेरा दिल ले लिया’ या गाण्याचं सादरीकरण झालं. या कार्यक्रमात काही महिलांसह सारिका दत्तात्रय भरणे यांनी नृत्य केलं. सध्या त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत.
VIDEO | सब कहते है तुने मेरा दिल ले लिया, दत्तामामांच्या पत्नीचा गाण्यावर ठेका @bharanemamaNCP | #DattatrayBharane | #Pune | #Indapur | #Dance pic.twitter.com/UKaFono9am
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2022
या कार्यक्रमात सुरु असलेल्या गाण्यावर राज्यमंत्री भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे तसेच त्यांच्या सहकारी महिलांनी यावेळी “परदेसिया, ये सच है पिया ” या गाण्यावर ठेका धरत काही वेळ डान्स केला. त्यांचा हा डान्स पाहून सर्वजण चकीत होत आहेत.
दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या संगीत कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेला डान्स देखील प्रचंड व्हायराल झाला होता. त्यांच्या डान्स व्हिडीओची सर्वत्र चर्चा झाली होती.
या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी आग्रह करत संजय राऊत यांना एका गाण्यावर ठेका धरण्यास भाग पाडलं. तसंच सुळे यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नृत्यात सहभागी व्हायला लावल्याचं त्यावेळी पाहायला मिळालं. दुसरीकडे, या डान्स व्हिडीओवरून सोशल मीडियात उलट-सुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.