आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी देशात आणि परदेशात साजरा केला जातो. महिलांना समर्पित या दिवशी प्रत्येकजण महिलांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत अनेक स्टार देखील महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहे. या वर्षी एक नवीन नाव जोडले गेले आहे आणि ते दुसरे कोणी नसून फिल्म इंडस्ट्रीतील दबंग सलमान खान (Salman Khan) आहे. भाईजानने त्याच्या खास पद्धतीने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.(Salman Khan won the hearts of mothers and women in a special way)
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खानची कला सर्वांनाच माहिती आहे. तो केवळ एक चांगला अभिनेता आणि गायकच नाही तर चित्रकारही आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त त्याने चित्रकलेच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानचे त्याच्या आईवर खूप प्रेम आहे. या खास प्रसंगी त्याने आईसाठी एक पेंटिंग बनवली आहे.
हा व्हिडिओ सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमान खान पेंटिंगमध्ये पूर्णपणे व्यस्त दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण आईला त्रास देऊ नका.” यासोबतच त्याने महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
सलमान खानने लिहिले की, “तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी कला पाहण्यासाठी तुम्ही माझ्या बायोवर क्लिक करू शकता.” या पेंटिंगमध्ये सलमानने 3 महिलांच्या आकृती बनवल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 3 धर्म दाखवून शांतीचा संदेश दिला आहे. त्या 3 आकृत्यांपैकी एक चित्रात मदर तेरेसांची आहे. व्हिडीओचा शेवट आईच्या प्रेमाने होतो, ज्यात लिहिले आहे, ‘प्रेम मोजले जात नाही, दिले जाते.’
आपल्या सर्वांना माहित आहे की सलमान खानचे त्याच्या आईसोबत खूप खास बॉन्डिंग आहे. फावल्या वेळेत आईसोबत वेळ घालवायला त्याला आवडते. तिच्यासोबत प्रवास करायला आवडते. तिच्यासोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. सलमान खानला दोन माता आहेत. सलमान जरी सलमा आणि सलीम खान यांचा मुलगा आहे, पण तो त्याच्या सावत्र आई हेलनचा तितकाच आदर आणि प्रेम करतो जितका तो त्याच्या खऱ्या आईचा करतो.
सलमानबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटांव्यतिरिक्त त्याला चित्रकलेचीही खूप आवड आहे. सलमानने अजून बरीच पेंटिंग्ज बनवली आहेत आणि ती त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहेत. सलमानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो टायगर 3 साठी चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे.