ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉर्नच्या(Shane Warne) निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, मायकेल क्लार्क आणि ग्लेन मॅकग्रा या खेळाडूंनी त्याला श्रद्धांजली वाहिली होती. शेन वॉर्न आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांची घट्ट मैत्री होती. शेन वॉर्नच्या निधनानंतर रिकी पाँटिंगला देखील अश्रू अनावर झाले होते.(shane warne final photo share social media)
या दरम्यान शेन वॉर्नच्या मित्राने त्याचा अखेरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून शेन वॉर्नच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. ४ मार्च २०२२ रोजी सायंकाळी थायलंडमधील कोह सामुई येथील एका व्हिलामध्ये शेन वॉर्नचा मृत्यू झाला होता. सुरवातीला शेन वॉर्नचा मृत्यू ह्र्दयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते.
पण थायलंड पोलिसांनी सोमवारी शवविच्छेदनाचा अहवाल सादर केला. त्यात शेन वॉर्नचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे. दरम्यान शेन वॉर्नच्या एका मित्राने त्याचा अखेरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेन वॉर्नचा फोटो शेअर केलेला मित्र थायलंडमध्ये त्याच्यासोबत होता.
https://www.instagram.com/p/CawnToRPJul/?utm_source=ig_embed&ig_rid=70c4303f-abe5-4e3f-8be3-dab0fbedc761
थायलंडमध्ये असताना शेन वॉर्नच्या मित्राने त्याचा एक फोटो काढला होता. पण त्याने स्वप्नात देखील विचार केला नसेल की, शेन वॉर्नचा तो काढलेला फोटो अखेरचा ठरेल. या मित्राचे नाव थॉमस हॉल असे आहे. तो कोह सामुई येथे वॉर्नसोबत होता. या फोटोमध्ये शेन वॉर्नच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. या फोटोवर शेन वॉर्नच्या चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
१९९२ मध्ये शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियन संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने १४५ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये शेन वॉर्नने तब्बल ७०८ बळी घेतले आहेत. शेन वॉर्नने १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९३ विकेट घेतल्या आहेत. जरी त्याला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु तो वेगवेगळ्या T20 लीगमध्ये खेळला होता.
२००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्सने त्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. ३ जून १९९३ रोजी वॉर्नने ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर ऍशेस कसोटी मालिकेच्या सामन्यात इंग्लंडच्या गॅटिंगला बाद केले होते. यावेळी त्याने टाकलेला चेंडू हा ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ मानला गेला होता. शेन वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या हातून सत्ता जाणार, ‘हा’ पक्ष मारणार बाजी, देशबंधू एक्झिट पोलमधून खुलासा
बापलेकीच्या जोडीने केले व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन; एकेकाळी स्वत:च गेले होते दारूच्या आहारी
‘पवारसाहेब ज्याचा हात घट्ट धरतात, त्याची हमखास विकेट जाते, हा इतिहास आहे’