माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचं ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झालं आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेन वॉर्न याने ऑस्ट्रेलियन संघासाठी आपल्या जबरदस्त फिरकी गोलंदाजीच्या बळावर अनेक विजय मिळवून दिले होते.
परंतु आता त्याच्या निधनानंतर पेशाने योगगुरू असलेल्या त्याच्या पत्नीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शेन वॉर्नच्या पत्नीचं नाव सिमोन कॅलाहन आहे. ती एक योग शिक्षिका आहे. आयुष्याची 10 वर्षे सोबत घालवल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
शेन वॉर्न आणि सिमोन हे दोघे 1992 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शेवटी 1995 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. दोन वर्षांनी त्यांना पहिले अपत्य झाले. सध्या सिमोन सध्या 52 वर्षांची असून ती ऑस्ट्रेलियात राहते.
शेन वॉर्नची माजी पत्नी सिमोन ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती आपल्या योगाभ्यासाचे फोटो सतत इन्स्टाग्रामवर शेयर करत असते. त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर लोक तिचे फोटो आणि व्हिडिओज पाहुन योगा शिकतात आणि इतरांनाही योगा करण्यासाठी प्रेरणा देतात.
शेन आणि सिमोन कॅलाहन यांचा 2005 मध्ये अचानक घटस्फोट झाला होता, परंतु मुलांमुळे ते नेहमी संपर्कात राहिले. सिमोनने द सनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘शेन वॉर्नने माझी पुन्हा फसवणूक केली आहे, म्हणून मी माझे नातेसंबंध पुढे वाढविले नाहीत.’ तसेच पत्रकार पॉल बॅरी यांनी 2006 मध्ये त्यांच्या ‘स्पून आउट’ या पुस्तकात लिहिले होते की, ‘शेन वॉर्नने 1000 महिलांसोबत सेक्स केला आहे, पण तो फक्त 5 वेळाच पकडला गेला.
शेन वॉर्न आणि सिमोन कॅलाहन यांना तीन मुलं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव ब्रुक आहे, ती 24 वर्षांची आहे. दुसऱ्या मुलीचे नाव समर आहे, ती 20 वर्षांची आहे. तर त्यांना 22 वर्षीय एक मुलगाही आहे त्याचं नाव जॅक्सन असं आहे. परंतु आता शेन वॉर्न याचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना मात्र अति दुख झालं आहे.