युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) या दोन शेजारी देशांमधील युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अनेक वेदनादायी कहाण्या समोर आल्या. भारतात परतण्यात यश आलेल्या आणि युक्रेनमधील सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांनी आपले हाल सर्वांसमोर मांडले आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या जगातील आणखी दोन शेजारी देशांचा एक किस्सा चर्चेचा विषय राहिला आहे.(Pakistani girl rescued from bomb and delivered safely to her father)
या कथेत भारताचा अंकित आणि पाकिस्तानची विद्यार्थिनी मारिया यांचा समावेश आहे. तिथे जोरदार गोळीबार आणि बॉम्बस्फोट सुरु असताना अंकितने मारियाला सुरक्षित स्थळी नेले. मात्र, हे दोन्ही विद्यार्थी अजूनही मायदेशी परतण्यासाठी आतुर झालेले आहेत. वृत्तसंस्थेशी संवाद साधताना हरियाणातील अंकितने सांगितले की, तो कीव पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये युक्रेनियन भाषेचा विद्यार्थी आहे.
अंकितचे म्हणणे आहे की, 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता संस्थेपासून काही अंतरावर स्फोट झाला, त्यानंतर सुमारे 80 विद्यार्थ्यांना बंकरमध्ये नेण्यात आले. त्याने सांगितले की, या गटात तो एकमेव भारतीय विद्यार्थी होता आणि पाकिस्तानची मारिया देखील या गटात होती. स्वतः अडचणीत सापडलेल्या अंकितने घाबरलेल्या मारियाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि तिच्या संरक्षणाचे आश्वासन दिले.
अंकितने सांगितले की, सततच्या स्फोटांमुळे जेव्हा ते निघू लागले तेव्हा मारियाही सोबत चालण्याविषयी बोलली. त्याने सांगितले की ते दोघे 28 फेब्रुवारी रोजी कीवमधील बुग्जाला रेल्वे स्टेशनकडे निघाले. दोन्ही विद्यार्थी पायी प्रवास करत होते आणि अंकितने दोन दिवस जेवले नसल्याचे सांगितले. यादरम्यान मारियाची प्रकृती अधिकच गंभीर दिसत होती, हे पाहून अंकितने स्वतःला धीर दिला आणि गोळीबारात 5 किमी अंतरावर असलेले स्टेशन गाठले.
वृत्तपत्राशी संवाद साधताना त्यांनी स्थानकाची स्थिती सांगितली की, तिथे खूप गर्दी होती आणि त्यांच्या 3 गाड्या चुकल्या होत्या. यानंतर सायंकाळी 6 वाजता दोन्ही विद्यार्थी कसेबसे ट्रेनमध्ये चढले. अंकितने सांगितले की, तासाभरानंतर ट्रॅकच्या बाजूला स्फोट झाला आणि गोळीबार सुरू झाला. एवढेच नाही तर खिडकीतून एक गोळी येत त्याच्या डोक्यासमोरून गेल्याचेही त्याने सांगितले.
अखेर दोन्ही विद्यार्थी 1 मार्चपर्यंत टेर्नोपिल स्टेशनवर पोहोचण्यात यशस्वी झाले. भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, येथे मारियाने पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क साधला आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने दोघांना वैद्यकीय विद्यापीठाच्या वसतिगृहात ठेवण्यात आले. यावेळी त्यांना कॉफी, ब्रेड आणि सूप देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रिपोर्टनुसार, या संपूर्ण घटनेवर पाकिस्तान दूतावासाने अंकितचे कौतुक केले. एका भारतीय मुलाने आमच्या मुलीला वाचवले. दूतावास म्हणाला की बेटा! खूप खूप धन्यवाद. दोन्ही देशांच्या जनतेने एकमेकांचे पाय खेचण्याची ही वेळ नसून प्रेम आणि पाठिंबा दाखवण्याची ही वेळ असल्याचेही ते म्हणाले.
अंकितने सांगितले की ते रोमानिया सीमेवर आहेत आणि कॅम्पमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील तापमान मायनस असून त्यांना खूप ताप असून अंग दुखत असल्याची माहिती त्यांनी दिली. तो म्हणाला की पाकिस्तानी दूतावासाने त्यांना टेर्नोपिल येथून बसने रोमानिया सीमेवर पाठवले, परंतु बसने त्यांना 15-20 किमी आधीच खाली उतरवले. येथून त्यांनी पायी सीमेपर्यंतचा रस्ता कापला.
महत्वाच्या बातम्या-
फेसबूकवर विदेशी महिलेशी मैत्री करणं भोवलं, लागला ८ लाखांना चुना; पोलिसांनी असा लावला छडा
उन्हाळ्यात पाण्यातूनच कमवा पाण्यासारखा पैसा; असा करा मिनरल वॉटरचा बिझनेस, कमवा करोडो
चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच झुंडच्या टीमचा जबरदस्त डान्स; नागराज मंजुळे यांनी स्वत: वाजवली हलगी