प्रवास करताना अनेकदा आपल्याकडून नजरचुकीने एखादा नियम तोडला जातो. त्यानंतर ई चलान पद्धतीने वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जातो. मात्र अनेकदा ही ऑनलाइन दंड आकारणी प्रणाली काहींना डोकेदुखी ठरते. असंच एक वाहतूक पोलिसांच्या अजब कारभाराचे एक उदाहरण समोर आले आहे.
हे प्रकरण वाचून तुम्ही देखील डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही. चक्क रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट न घातल्याचा दंड वाहतूक पोलिसांनी आकारला आहे. हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी 500 रुपयांचा दंड आकाराल्याचे त्याला दिसून आलं.
तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय.. कल्याणमधील द्वारली येथे राहणारे गुरुनाथ चिकणकर हे रिक्षा चालक आहे. चिकणकर या रिक्षा चालकाला ऑनलाइन चालान आले. त्याने अॅपवर तपासून पाहिले असता चक्क हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी 500 रुपयांचा दंड आकाराल्याचे त्याला दिसून आलं आहे.
चिकणकर यांना हा दंड भरण्यास दहा ते बारा दिवस विलंब केला. तसेच त्यांनी याबाबत त्यांच्या मेहूण्यांकडे विचारपूस केली असता त्यांनी ई चलान पाहून सांगितले की, हेल्मेट न घातल्याने हा दंड आकारला आहे. तेव्हा गुरुनाथ यांना धक्का बसला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी दंड न भरल्याने त्यांना चक्क कोर्टाकडून समन्स आले आहे.
मात्र दुचाकी चालकाचा दंड रिक्षा चालकाला आकारल्याचे बाब अखेर समोर आली. त्याचं झालं असं, मुंबईच्या कांदिवली भागात 3 डिसेंबर रोजी एक दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत होता. त्याचा फोटो वाहतूक पोलिसांनी काढला. त्याचे हे चलन असल्याचे समोर आले आहे.
मात्र आता या दुचाकी चालकाचा दंड ऑनलाईन प्रणालीच्या ई-चलानद्वारे रिक्षा चालक गुरुनाथ यांना आकारण्यात आला आहे. चिकणकर यांनी या प्रकरणी कल्याण वाहतूक पोलिसांना विचारणा केली. मात्र त्यांना ठाण्याला जाण्यासाठी सांगण्यात आले. मात्र माझी चूक नसतांना मी ठाणे येथे का जावे, वाहतूक पोलिसांनी केलेली चूक त्यांनी सुधारून द्यावी, अशी मागणी गुरुनाथ यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
सलमान-कतरिनाचा टायगर ३ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; टीझर आला समोर
चाणक्यनीती: कोणालाही आपलंसं करण्यासाठी ‘या’ पाच गोष्टी आत्मसात करा, समोरचा तुमचा फॅनच होऊन जाईल
अभिनेत्री संस्कृती बालगुडेवर होतोय कौतुकाचा वर्षाव; ‘या’ चित्रपटासाठी पटकावले ४ आंतरराष्ट्रीय पुरस्कार
VIDEO: झुंड पाहिल्यानंतर धनुषही झाला भावूक, म्हणाला, ‘चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकून घेतलं’