काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला(Aryan Khan) गेल्यावर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं(NCB) ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. एनसीबीनं क्रूझवर टाकलेल्या छाप्यात आर्यनला ताब्यात घेतले होते. त्यानंतर जवळपास ३ आठवडे आर्यन खान हा आर्थर रोडच्या तुरुंगात होता.
त्यानंतर या प्रकरणावरुन बराच वाद निर्माण झाला. त्यामुळे NCB नं SIT नेमली होती. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा झाली. एनसीबीच्या (NCB) मुंबई विभागाने केलेल्या आरोपांच्या विरोधात एसआयटीचे काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. यामुळे आता या केसमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.
तसेच या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीने एक विशेष चौकशी समितीची स्थापना (NCB’s SIT) केली होती. आर्यन खानकडे (Aryan Khan) ड्रग्ज आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती, असं एसआयटीने नोंदवलं आहे.
त्यांच्या तपासात आर्यनविरोधात कुठलाच पुरावा आढळला नसल्याचं समोर आलं आहे. कॉर्डेलिया क्रूझवरील कारवाईत आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते, एनसीबीनं स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर आली आहे.
तसेच आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. त्याचसोबत NCB च्या नियमानुसार छापा टाकताना व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला नव्हता. गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्स सिंगल रिकव्हरी म्हणून नोंदवले होते असं SIT चौकशीतून समोर आलं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीनं 3 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती. या छाप्यात एनसीबीने क्रूझमधून 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रॉन, 21 ग्रॅम गांजा, MDMAच्या 22 गोळ्या आणि रोख 1.33 लाख रुपये जप्त केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
रशियाने युक्रेनवर हल्ला करताच अंबानी-अडानींचे बुडाले तब्बल ८८ हजार कोटी, वाचा नेमकं काय घडलं..
शेतकऱ्याचा नाद नाय! बुलेटपासून फक्त ‘एवढ्या’ रुपयांत बनवला ट्रॅक्टर, आता १४० शेतकऱ्यांनी केला खरेदी
‘रागिनी एमएमएस’फेम अभिनेत्रीने सगळेच्या सगळे कपडे काढून केले बोल्ड फोटोशूट; पाहा व्हायरल फोटो
माझा बाप कोण आहे माहितीय का? अशी धमकी देणारांनो मिझोरममधील हे फोटो एकदा पहाच…